Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजाऊ च्या लेकीची गरुड भरारी....! राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी कोंडीच्या श्रावणी शिंदे ची निवड....!!

 जिजाऊ च्या लेकीची   गरुड भरारी....! 

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी कोंडीच्या श्रावणी शिंदे ची निवड....!! 

कोंडी(कटूसत्य वृत्त):-क्रीडा व युवक संचालनालय पुणे  विभाग यांच्यावतीने सोलापूर येथील क्रीडा संकुल येथे दिनांक 27 ,28  ऑक्टोबर रोजी झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये तलवारबाजी(ईपी) या प्रकारात 14 वर्षीय मुलीच्या गटामध्ये विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी येथील विद्यार्थिनी श्रावणी दीपक शिंदे हिने दुसरा क्रमांक पटकावून गरुड झेप घेतली. हे यश खेचून आणल्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  येत्या एक नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहेत. या स्पर्धेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थिनी श्रावणी भोसले हिने बाजी मारली आहे.   सतरा वर्ष वयोगटामध्ये  प्रकार ईपी अंतर्गत तलवारबाजी स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने नुकतेच देण्यात आले. 

कोंडीच्या माळरानावर गेल्यावर एका शेतकरी कुटुंबातील धाडसी युवकाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि विशेषता मुलींना इंग्रजी माध्यमाचे तसेच महाविद्यालयीन शिक्षण मिळावे,  या विधायक आणि पारदर्शक विचारधारेतून जिजाऊ शिक्षण संकुलाची मुहूर्तमेढ रोवली.आणि   त्याच विस्तारातून विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. स्पर्धेच्या आणि संगणक युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये या दृष्टिकोनातूनच या माळरानावर विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून कला वाणिज्य आणि विज्ञान तसेच क्रॉप सायन्स या शाखा सुरू असून सध्या या ठिकाणी शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. 

विद्यार्थ्यांच्या  सुप्त कला गुणांना वाव  मिळावा यासाठी या ठिकाणी क्रीडा शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे काम करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  त्याचाच भाग म्हणून अकरावीची विद्यार्थिनी  श्रावणी शिंदे इच्छुक राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी झालेली निवड ....! या विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळाचे धडे देण्याचे काम सुरू असल्यामुळे शहरातील विद्यार्थी सुद्धा या निसर्गरम्य वातावरणात बहरलेल्या  महाविद्यालयाकडे आकर्षिले जात आहेत.  गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिराच्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये आकाशाला गवसणी घालून शिक्षण संकुलाचे नाव रोशन केले आहे.  सध्या एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी श्रावणी शिंदे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गरुड झेप घेतली आहे. 

या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश नीळ, प्राचार्या सुषमा निळ,  तेजश्री कुलकर्णी, क्रीडा शिक्षक दिलीप भोसले,  प्रा.  विश्वनाथ उपाध्ये, रवी कोत कुंडे,   वैभव मसलकर,  दादासाहेब निळ, संकेत मोरे आदींनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments