माढ्याच्या जगदंबा गणेश मंडळाला जिल्हास्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

माढ्याच्या जगदंबा गणेश मंडळाला जिल्हास्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार

 माढ्याच्या जगदंबा गणेश मंडळाला जिल्हास्तरीय उत्कृष्ट गणेश

 मंडळाचा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार

 मंडळाचा सन्मान 


माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील जगदंबा गणेश मंडळाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट गणेश मंडळाचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गणेश उत्सवा बरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन विविध कार्यक्रम घेऊन उल्लेखनीय कार्य केलेल्या राज्यभरातील गणेश मंडळाचा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला. माढ्यातील कसबा पेठेतील जगदंबा गणेशोत्सव मंडळाला सोलापूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख हस्ते प्रदान केला.यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांना सन्मान पत्र व २५ हजारांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मंडळाच्या कामाचा आढावा ऐकुन घेतल्यानंतर मंत्री मुनगंटीवार यांनी जगदंबा मंडळाचे विशेष कौतुक केले.जगदंबा गणेश मंडळ मागील अनेक वर्षांपासून माढा शहरात गणेश उत्सवाच्या कालावधित विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतल्याने मंडळाचा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.मुंबई मधील रविंद्र नाट्य मंदिरात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.या समारंभास प्रधान सचिव विकास खारगे यांचेसह सांस्कृतिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंडळाचे पदाधिकारी,सदस्यांनी पुरस्कार स्विकारला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages