चव्हाणवाडी टें गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-माढा तालुक्यातील चव्हाणवाडी (टें) गावात राजकीय नेत्यांना सर्वप्रथमच गावबंदीचा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आहे.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना गाव बंदी करण्याचे एकमताने ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आतापर्यंत सामोपचाराची भूमिका घेतली होती. मात्र शासनाकडून कसलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेते मंडळी हे आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. म्हणूनच माढा तालुक्यातील चव्हाणवाडी टें गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. चव्हाणवाडी टें येथे सकल मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चव्हाणवाडी टें गावात एकमुखाने सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला.
0 Comments