Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

 लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी


डाळा (कटुसत्य वृत्त):  श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.  महात्मा गांधी यांचा जन्मदिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याप्रसंगी विद्यार्थी शुभम यादव, रेणुका गिरी, तुषार बोडरे, दैवश्री धावणे यांनी महात्मा गांधीजींचे कार्य व त्यांचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले.  भारताला स्वतंत्र मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी यांचे खूप मोठे योगदान होते. रौलट कायदा, सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह इत्यादी विषयी मार्गदर्शन  प्रा. प्रवीण शेळके यांनी  विद्यार्थ्यांना केले. तसेच महात्मा गांधी यांच्या आचार आणि विचारांचे पालन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे आवाहन प्रा. स्वप्निल कदम यांनी केले. जे काम कोणत्याही  शास्त्राने करता येत नाही ते नैतिकता, सत्य, अहिंसा या मार्गाने करता येते ही शिकवण गांधीजींनी समाजाला दिली असे मनोगत महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रा. नवनाथ गोसावी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील  सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अमृता माळी, प्रस्तावना रोहन पवार व आभार प्रदर्शन मोनाली चव्हाण या विद्यार्थ्यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments