पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट मधील शासकीय कोर्सेसच्या प्रवेशानां
१५ ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ
सातारा: (कटूसत्य वृत्त):- साताऱ्यातील पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास परीक्षा मंडळ मुंबई बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू झालेले आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साईट, ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटार आर्मीचेर वायडींग, टू व्हीलर व फोर व्हीलर डिझेल इंजिन मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर वीथ एम एस ऑफिस, कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स, एअर कंडिशन रेफ्रिजेशन मेकॅनिक, प्लंबर तसेच डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अशा विविध कोर्सेसचा समावेश आहे आणि या सर्व कोर्सेसना प्रवेश देण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पाटील यांनी सांगितले. या कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी आठवी दहावी व बारावी पास नापास अशी शैक्षणिक पात्रता आहे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व कामगार कर्मचारी सुद्धा प्रवेश घेऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. तेव्हा कोर्सेससाठी प्रवेश घेणारे इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री पाटील यांच्याशी ९८२२०९७०७१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
.jpg)
0 Comments