स्वतंत्र शेतकरी मंत्रालयाच्या जागृतीसाठी शेतकरी बचाव - आक्रोश
अभियान. - धनंजय पाटील काकडे.
नागपूर (कटूसत्य वृत्त): दि. 3 ऑक्टोबर 2023 ला शेतकरी, वारकरी - कष्टकरी महासंघाची बैठक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम देवी चौक ,सुभाष रोड, नागपूर येथे दुपारी ठीक ३ वाजता पार पडली . या बैठकीला विदर्भातील नेते,युवा कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या . श्री गुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष श्री अशोकरावजी यावंले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. श्री रुपरावजी वाघ माजी उपसर्वाधिकारी यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती रेखाताई निमजे यांनी शेतकरी बचाव - आक्रोश अभियाना मध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले.
कर्जमुक्ती आंदोलनाचे सरसेनापती श्री धनंजय पाटील काकडे म्हणाले - शेतकऱ्यांना न्याय ,अधिकार व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र शेतकरी मंत्रालया ची गरज का तयार झाली? ही भूमिका विशद करून सांगितली. या अगोदर फेब्रुवारी 2023 या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातून देहू ते पंढरपूर( मार्गे अड्याळ टेकडी) स्वतंत्र शेतकरी मंत्रालयाच्या जागृतीसाठी असा 4500 किमी. चा प्रवास पूर्णकरून रॅलीचा समारोप, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता तत्त्वज्ञान मंदिर.( सांगोला रोड पंढरपूर )येथे झाला होता, याची त्यांनी आठवण करून दिली. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, वीज बिलातून मुक्ती तसेच शेतकऱ्यांचे आयात- निर्यात धोरण व वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यात यावे. यासाठी वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करण्यात यावा, संपूर्ण शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे तसेच स्वतंत्र शेतकरी मंत्रालयासाठी जन चळवळ उभी करण्यात यावी, याकरिता विदर्भातील अकरा जिल्ह्यातून शेतकरी बचाव - आक्रोश अभियानची सुरुवात 25 ऑक्टोबर ला नागपूर येथून होऊन, स्व. साहेबराव पाटील करपे आत्महत्या स्मृती नदीघाट पवनार (जिल्हा वर्धा) येथे 07 नोव्हेंबर 2023 समारोप होईल. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे आर्थिक मदत देऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
सीता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख रावेरीकर यांनी स्व.शरद जोशींचा मार्शल प्लॅन लागू करण्यात यावा व तसेच शेतकरी बचाव -आक्रोश अभियानाचे नेतृत्व श्री धनंजय पाटील काकडे यांनी करावे, असे त्यांनी जाहीर केले. तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष संजयभाऊ मुळे यांनी जागृती अभियान मध्ये वाहन यात्रेची व्यवस्था करण्यात येईल, त्यासाठी तरुण युवक - युवतीने सहभागी होण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचविण्यासाठी श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर, सर्वतोपरी प्रयत्न करेल असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात श्री पुरुषोत्तम भाऊ बनसोड,अमरावती, भंडारा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मनीषाताई पुंडे,श्री माथने साहेब ,श्री शेंडे साहेब ,चावके साहेब व इतर गुरुदेव सेवक व महिला या बैठकीला उपस्थित होत्या . युवा आघाडीचे कार्यकर्ते श्री मिथुन मोहरकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले

0 Comments