दत्तात्रय जाधव यांची कार्य कौतुकास्पद ~आमदार शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 26, 2023

दत्तात्रय जाधव यांची कार्य कौतुकास्पद ~आमदार शिंदे

 दत्तात्रय जाधव यांची कार्य कौतुकास्पद ~आमदार शिंदे

रांझणी येथील दत्तात्रय जाधव यांचे 40 व्या वाढदिवसानिमित्त 80 व्या

 वेळी रक्तदान. वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-रांझणी तालुका माढा येथील संयमी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांनी आज पर्यत केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून यापुढे दत्तात्रय जाधव यांना काही अडचण आल्यास त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले. ते रांझणी तालुका माढा येथे दत्तात्रय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, दत्तात्रय जाधव यांचा 40 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या 80 व्या. वेळी रक्तदान ही  बाब कौतुकास्पद असून त्यांची लवकरच गिनीज बुकात नोंद होईल. दत्तात्रय जाधव याचा आदर्श इतर युवकांनी घेऊन युवकांनी रक्तदान केले पाहिजे.

           यावेळी प्रास्ताविकात दत्तात्रय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा सांगितला ते म्हणाले की माझ्या वाढदिवसानिमित्त हार तुरे याच्यावर खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केलाय.त्यांनी वाढदिवसानिमित्त सलग आठ दिवस सामाजिक कार्य केले. यामध्ये 15 ऑक्टोंबर रोजी 18 वर्षे वयोगटापर्यंत सर्वांना मोफत लसीकरण इंदापूर येथील यश हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नामदेव गार्डे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तुळजापूरहून पायी ज्योत आणणाऱ्या भाविकांना मोफत चहाचे वाटप भिमानगर चौक येथे करण्यात आले. 16 ऑक्टोबर रोजी भिमानगर व आढेगाव हायस्कूल मधील इयत्ता नववी व दहावीच्या 151 मुलींची मोफत आरोग्य तपासणी संजीवनी हॉस्पिटल इंदापुर येथील तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आली. 17 ऑक्टोबर रोजी श्रावणबाळ आश्रम येथे मोफत शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. 18 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर इंदापूर येथील साई हॉस्पिटल येथे डॉ.कल्पना खाडे यांनी केले. 19 ऑक्टोबर रोजी भिमानगर मधील जेष्ठ नागरिकांची मोफत हृदयरोग तपासणी इंदापूर येथील डॉक्टर सागर दोशी यांच्या हस्ते करण्यात आली. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेऊन त्यानंतर संध्याकाळी आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते रक्तदाता दत्तात्रय जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

       यावेळी डॉक्टर मिलिंद खाडे म्हणाले रांजणी येथील युवकता दत्तात्रय जाधव यांनी आज केलेले सामाजिक कार्य यामध्ये कुटुंबीयांना कुटुंबीयांना यामध्ये हातभार लावता आला याचा अभिमान आम्हाला आहे दत्तात्रय जाधव यांच्याकडून सामाजिक कार्य वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
          डॉक्टर कल्पना खाडे मॅडम म्हणाल्या दत्ता यांचा सतत सामाजिक कार्यात हातभार असून त्यांनी आजपर्यंत केलेल्या रक्तदानाचा आम्हाला अभिमान आहे यापुढे त्यांच्या सामाजिक कार्यात आम्ही सहभाग घेऊन त्यांनी आपले रक्तदानाचे  शतक पार करावे अशा प्रकारच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
            यावेळी माढा तालुक्याचे भाग्यविधाते सामाजिक आमदार बबन दादा शिंदे, करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे साहेब,  रक्तदानाचे मार्गदर्शक डॉ. मिलिंद खाडे,डॉ.कल्पना खाडे मॅडम इंदापूर,सौ.अश्विनी जाधव, डॉ. सागर दोशी, डॉ. नामदेव गार्डे, डॉ,आमोल शेंडे, डॉ. नवनाथ  पवार, वेताळ आण्णा जाधव,   बाळासाहेब बागल, संजयदादा पाटील,  रमेश पाटील, नितीन बागल, विवेक जाधव, अशोक म्हसकर, सौदागर पोळ मामा, प्रभाकर बागल, विश्वनाथ बागल, भरत मस्के, बाळासो जाधव, किसन जाधव,  अर्जुन पाटील, नारायण मोहिते, बाळासो उबाले,  विलास जाधव, अतुल जाधव, प्रशांत जाधव, सतीश तोबरे, अतुल चौगुले, तुकाराम राखुंडे, औदुबर जाधव,  आदित्य जाधव, सतीश चौगुले, अविनाश ननवरे,  राजू नलवडे, अप्पा यादव,  शहाजी चव्हाण, सुभाष जाधव, श्रीराम जाधव, हनुमंत चव्हाण,  सुनील चव्हाण,  विकास गुळूमकर, उद्धव जाधव आदि उपस्थित होते.


          यावर्षीचा संयमी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचा  "सामाजिक आमदार" हा पुरस्कार माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे यांना प्रदान करण्यात आला तसेच  "संयमी आमदार"  म्हणून करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages