विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी स्पर्धेत पापरी
शाळेचा दबदबा कायम.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये मोहोळ तालुक्यातील पापरी आदर्श शाळेने लहान व मोठ्या गटात आपला 'दबदबा कायम राखला आहे. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभाग दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्वहेर्धेचे आयोजन करते. यामध्ये कथाकथन, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, समुहगीत गायन व समूह लोकनृत्य स्पर्धा घेण्यात येतात. विजेत्या स्पर्धकांना किंवा संघास तालुकास्तर व जिल्हा स्तरावर रोख बक्षिसे दिली जातात. गुरुवारी २६ ऑक्टोंबर रोजी कोन्हेरी केंद्रातील केंद्रस्तरीय स्पर्धा कोन्हेरी येथे पार पडल्या. या पावरी शाळेने घवघवीत यश संपादन करत विजयाची घोडदौड कायम राखली आहे. यामध्ये यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे १) कथाकथन (लहान गट) प्रांजली वसेकर - दवितिय क्रमांक (२) कथाकथन (मोठा गट) शर्वरी टेकळे - प्रथम क्रमांक 3 निबंध लेखन (मोठा गट) चैष्णवी माळी-प्रथम क्रमांक (४) वक्तृत्व (लहान गट) कृष्णा चौधरी - द्वितिय क्रमांक (4) वक्तृत्व (मोठा गट) प्रगती गायकवाड-प्रथम क्रमांक ६ चित्रकला (लहान गट) श्रेया पांढरे - प्रथम क्रमांक व ऋतुराज जगताप-दुद्वितीय क्रमांक ७ समुहगीत गायन स्पर्धा (लहान गट)-द्वितीय क्रमांक समुहगीत गायन (मोठा गट)-द्वितीय क्रमांक Qसमुहलोकनृत्य (मोठा गट) - द्वितीय क्रमांक (१०) समुहलोक नृत्य (लहान गट) - प्रथम क्रमांक यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्वच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख्य श्रीकांत खताळ साहेब शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके उपाध्यक्ष समाधान सतवंत सर्व सदस्य, ग्रामस्थ यां शिक्षक व विद्याथ्यांचे अभिनंदन केले.

.jpg)
0 Comments