सिंहगड पब्लिक स्कूल, सोलापूर या शाळेचे नृत्य कला क्षेत्रामध्ये घवघवीत यश
सोलापूर (कटुसत्य वृत्त): सेंट जोसेफ स्कूल बार्शी आणि सी.बी.एस.ई.- हब यांच्या सयुंक्त विद्यमाने दि.२१.१०.२०२३ रोजी दृश्य 23 या समूहनृत्य स्पर्धेचे बार्शी येथे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या आकर्षक नृत्य सादरीकरणातून कॅटेगरी-I (इ. ४ थी ते ७ वी) मध्ये भारतीय सांस्कृतिक थीम वरील या नृत्यामध्ये द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रु. 15,000/- चे रोख पारितोषिक मिळवले आहे. या नृत्य स्पर्धेत आदित्य भोसले, आर्यन साळुंखे, आर्या घनवटे, शिवतेज कांचन, अथर्व गुरव, दिव्यांश गुप्ता, माही पाटील, प्राची चंदनशिवे, हर्षिता होणपारखे, विशाखा अरेनवरु, राजवर्धन नवले, श्रुष्टी क्षीरसागर, वरद पाटील, गौरी भोसले ई. विद्यार्थी सहभागी होते. तसेच कॅटेगरी-II (इ. ८ वी ते १०वी) मध्ये रेट्रो ते मेट्रो या नृत्य स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचे रु.5000/- चे रोख पारितोषिक मिळाले आहे. या नृत्य स्पर्धेत अदिती शिंदे आर्यन नवले, अवधूत भानवसे, समर्थ शिंदे, श्रुती बालटे, ऐनेश रमावत, साक्षी पाटकर, नीता भडंगे, चैतन्य गायकवाड, श्रेया भोसले, सई साळुंखे, सायरीश पठाण, स्नेहल मेहता, आर्या गायकवाड, नैतिक मंत्री, विनीत परदेशी ई. विद्यार्थी सहभागी होते. सोलापूर आणि सातारा येथील 20 शाळां विरुद्ध झालेल्या चुरशीच्या या नृत्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन म्हणून आमच्या सिंहगड पब्लिक स्कूल, सोलापूर या शाळेतील डान्स टीचर श्री. सुदर्शन माने यांना प्रथम क्रमाकांचे रु.5000/- चे रोख पारितोषिक मिळाले आहे.आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या असामान्य नृत्याविष्काराचे प्रदर्शन करून शाळेच्या लौकिकात भर घातली. त्यांची मेहनत आणि जिद्द खऱ्या अर्थाने रंगली आहे. त्यांच्या वेशभूषे वर विशेषत्वाने लक्ष देण्यात आले होते. नृत्य किंवा डान्स हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच नव्हे तर संबंधित संस्कृतीचा आत्मा असतो. सिंहगड पब्लिक स्कूलचा विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्याचा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी नियमित प्रयत्न असतो.या स्पर्धेसाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले यांचे प्रोत्साहन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले व विजयी संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे डान्स टीचर सुदर्शन माने व सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments