Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आंतरविद्यापिठीय स्पर्धेसाठी निवड

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आंतरविद्यापिठीय स्पर्धेसाठी निवड


सोलापूर (कटुसत्य वृत्त):  श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अंशुल राठोड याची भारतीय कृषी संशोधन परिषदेने आयोजित केलेल्या आंतरविद्यापिठीय एक पात्री नाटक या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशासाठी लोकमंगल समूहाचे संस्थापक व अध्यक्ष मा सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते अंशुल राठोड याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ सौ अनिता ढोबळे, प्राचार्य डॉ अमोल शिंदे, प्राचार्य सतीश देवकर उपस्थित होते. अंशुलचा नेहमीच महाविद्यालयातील विविध नाटक, पथनाट्य सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग असतो. त्याच्या या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष मा रोहनजी देशमुख, सचिव डॉ सौ अनिता ढोबळे, प्राचार्य डॉ अमोल शिंदे, प्राचार्य डॉ सतीश देवकर प्राचार्य प्रदिप आदलिंगे आदींनी त्याला स्पर्धेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments