संत सावता माळी विद्यालयातील तीन खेळाडूंची गुजरात येथे होणाऱ्या
राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
अरण (कटूसत्य वृत्त):-विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे दि.21 ते 23 संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेतून संत सावता माळी विद्यालयातील रोशन सतीश दोरगे 19 वर्षाखालील गटात राज्यात प्रथम क्रमांकास एक सुवर्ण पदकासह,तीन रजत पदके मिळवली.पायल भालचंद्र गाजरे 19 वर्षाखालील गटात राज्यात द्वितीय क्रमांकास1सुवर्णपदक,3 कास्य पदके मिळवली.श्रेया विलास भापकर 19 वर्षाखालील गटात सांघिक तृतीय क्रमांकास कास्य पदक मिळवले.कृष्णा संभाजी शिंदे 17 वर्षाखालील गटात राज्यात द्वितीय क्रमांकास 1सुवर्णपदक,1रजत पदक,1कास्य पदके मिळवली.राज विलास सावंत17 वर्षाखालील गटात राज्यात सांघिक प्रथम क्रमांकाह 1सुवर्ण पदक संपादन केले. रोशन दोरगे, पायल गाजरे,कृष्णा शिंदे यांची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी खेळाडूंना सावता घाडगे (NSNIS) यांची मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मा बी एस पाटील साहेब ,कार्याध्यक्ष भारत शिंदे,सचिव एस डी कुलकर्णी , उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापक एस पी मोरे सर, पर्यवेक्षक बी जे फरड सर यांनी अभिनंदन केले.
0 Comments