Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ येथील कन्या प्रशाला उड्डाणपूल कामाच्या संतगतिबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रास्ता रोको चा इशारा याबाबतचे दिले निवेदन..........

 मोहोळ येथील कन्या प्रशाला उड्डाणपूल कामाच्या संतगतिबाबत

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रास्ता रोको चा इशारा याबाबतचे दिले

 निवेदन..........




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मोहोळ येथील राष्ट्रीय महामार्ग 65 क्रमांकावर कन्या प्रशाला चौक येथे चालू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने चालू असून सर्विस रोडला ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत,यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असून रुग्णवाहिका,शालेय मुले तरकारी माल यांना उशीर होत आहे.रुग्णवाहिका वेळेत न पोचल्याने अनेक पेशंटच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने खड्डे भरून सर्विस रोड दुरुस्त करावा तसेच उड्डाणपुलाचे काम हे लवकरात लवकर संपवावे.आदी मागणीचे निवेदन मा. तहसीलदार,मा.पोलीस निरीक्षक तसेच प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांना आज मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले.

   याप्रसंगी उपनगराध्यक्ष बापू डोके प्रवक्ते अभयसिंह गायकवाड नगरसेवक मुस्ताक शेख,उपसभापती प्रशांत बचुटे, माजी उपसरपंच गौतम क्षीरसागर,शकील शेख,मुकेश बचुटे राजे सुतार आदी  उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments