राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करणेत आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, आनंद भंडारी, संचालक,पंचायत राज, राज्य व्यवस्थापन कक्ष, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली श्याम पटवारी, उपसंचालक, पंचायत राज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, राज्य व्यवस्थापन कक्ष, पुणे, प्रशिक्षण् व क्षमता बांधणी तज्ञ, अमर ढाले, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी (पं), जिल्हास्तरयी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानचे कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्र विभागीय प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक तसेच प्राचार्य ग्रामसेवक प्रशिक्षण (GTC) पुणे, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र (PRTC) गौडगांव, बार्शी हे आढावा बैठकीस उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीमध्ये सर्वांची योजना सर्वांचा विकास (PPC) या मोहिमेचा आढावा घेणेत आला. सन 2023-24 चे व सन 2022-23 च्र प्रलंबित पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती विकास आराखडे ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर अपलोड करणे साठी तालुका व्यवस्थापक व गट विकास अधिकारी यांचा सखोल आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत माहे सप्टेंबर 2023 अखेर जिल्हास्तरावर, तालुकास्तरावील व गणस्तरावरील प्रशिक्षण माहे नोव्हेबर 23 पुर्वी पुर्ण करुन सदर पुर्ण केलेले प्रशिक्षणाची माहिती पोर्टल वर भरुन सदर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रामध्ये प्रमाणपत्र वाटप करणेबाबत सांगण्यात आले. आभासी प्रशिक्षण वर्ग प्राथमिक स्वरुपात प्रत्येक तालुक्यात एक सुरु करणेबाबत आवश्यक बाबी व आवश्यक साहित्याची माहिती देण्यात आली. 15 वा वित्त आयोगाच्या प्राप्त निधीचा आढावा तालुका निहाय घेण्यात आला.राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन 2022-23 या वर्षाचे लेखापरिक्षण करुन घेणे व अहवाल सादर करणेबाबत सांगितले आहे. तसेच Panchayat Development Indix (PDI) , आकांक्षित तालुका कार्यक्रम Ease of Doing Business, Best Particices, BHIM-UPI व QR Code, Gem Intergration, GS Nirnay ॲप, ग्रामपंचायत ISO, Mahaegram प्रमणाली इ. बाबत आढावा घेण्यात आला.
मा. संचालक यांनी घेतलेल्या बैठकीमधील मुद्देबाबत इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) यांनी सर्व गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी (पं) व सर्व तालुका व्यवस्थापक यांना आढाव्या बैठकीतील दिलेलया सुचनेप्रमाणे कामा करण्यात सांगितले. मा. श्रीम. मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी (भाप्रसे) यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत प्रशिक्षण लवकरच पुर्ण करणेबाबत व आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतीने सर्व प्रकारचे दाखले देण्यात योव. तसेच आपले सरकार अंतर्गत इतर सुविधाही देण्यात यावे असे सागुन सदरची आढावा बैठक संपविण्यात आली.

No comments:
Post a Comment