लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व इंडक्शन कार्यक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 12, 2023

लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व इंडक्शन कार्यक्रम संपन्न

 लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या

 विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व इंडक्शन कार्यक्रम संपन्न 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तरुणांनी नोकरीबरोबरच विविध कृषी व कृषी संलग्नित उद्योगांमध्ये उतरून स्वतः उद्योजक होउन समाजातील इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर सर्वांनी आपापल्या जिल्ह्य़ातील उत्पादनांचे मार्केटिंग करुन त्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. तरूणांनी व्यसनापासून दूर राहून  स्वतःचे आरोग्य जपावे. प्रत्येकाने आपल्या गावाला समृद्धशाली गाव बनवण्यासाठी समृद्ध गाव या योजनेत सहभागी व्हावे व आपले ग्राम स्वच्छ व समृद्ध करावे असे मनोगत लोकमंगल समूहाचे संस्थापक व अध्यक्ष मा. सुभाषबापू देशमुख यांनी व्यक्त केले. श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल  महाविद्यालयामध्ये आयोजित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतसमारंभात बापूसाहेब बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शिंदे, लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश देवकर, लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे व लोकमंगल कृषीव्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य नवनाथ गोसावी, लोकमंगल फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ अमोल शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांनी संस्थेची व त्यातील विविध महाविद्यालयांची व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. माननीय सुभाषबापू देशमुख यांनी  लोकमंगल शैक्षणिक संकुलातील  विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबतीत सर्वतोपरी मदत केली जाईल व त्यांना शैक्षणिक बाबतीत येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा रोहनजी देशमुख व सचिव डॉ सौ अनिता ढोबळे यांच्या संकल्पनेतून  विद्यार्थ्यांना  बॅग व शैक्षणिक किटचे वाटप माननीय सुभाषबापूंच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता प्राचार्य डॉ सचिन फुगे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. याप्रसंगी लोकमंगल शिक्षण संकुलातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages