Hot Posts

6/recent/ticker-posts

जयहिंद विद्यालयाचा विज्ञान प्रयोग राष्ट्रीय पातळीवर

 जयहिंद विद्यालयाचा विज्ञान प्रयोग राष्ट्रीय पातळीवर


कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जयहिंद विद्यालय कसबे तडवळे येथील विज्ञान प्रयोगाची राष्ट्रीय पातळी वर निवड झाली आहे. इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन अंतर्गत शाळेतील इयत्ता 9 वी मधील आशिष जयराम माळी या विद्यार्थ्याने होम मेड रूम हीटर हा प्रयोग सादर केला होता. त्याची ज़िल्हा व राज्य स्तरावर निवड झाली होती. आता दिनांक 9 ते 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली  येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी हा प्रयोग जाणार आहे. या विद्यार्थ्यास विज्ञान शिक्षक घोडके ए. आर. व कोकणी आर. जी. यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक नलावडे सी.एम., शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टी.पी. शिनगारे, शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी शुभेच्याचा वर्साव केला
Reactions

Post a Comment

0 Comments