केवड आश्रमशाळेच्या वर्धापन दिना निमित्त-राज्य स्तरीय पुरस्कार
माढा (कटूसत्य वृत्त):- पुरस्काराने जगण्यासाठी प्रोत्साहन मिळते.काम करण्यासाठी उत्साह वाढुन जगायला बळ मिळते.पुरस्काराने समाजाला प्रेरणा मिळते असे मत शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.
केवड (ता. माढा) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी प्रा.सावंत बोलत होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या मान्यवरांना शाळेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात ५१ जणांनी रक्तदान केले. श्वेताली धर्मे व अपर्णा चव्हाण या विद्यार्थ्यांनींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. प्रास्ताविकातुन कृष्णा घाडगे यांनी शाळेचा आढावा मांडला.पुरस्कार वितरण सोहळ्यास सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत,नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे, जलतज्ञ अनिल पाटील, सुहास पाटील, महेश सरवदे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे आनंद कानडे, फत्तेसिंह पवार, हनुमंत पाडोळे, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन लटके, क्रीडा अधिकारी कैलास लटके, महेश हरहरे, राजेंद्र पाटील, नितीन पाडूळे, राजाभाऊ लवटे,अरुण नाईकवाडे,दीपक आरे,रामभाऊ मस्के,डॉ.विकास मस्के,दत्तात्रय लटके, अमोल लटके, सुनील धर्मे, भारत माने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक गणेश चव्हाण, शाळेचे व्यवस्थापक कालिदास चव्हाण, गणेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी संगीत विशारद उदय शेलार निलेश देवकुळे यांच्या वाद्यसाथीत विद्यार्थ्यांनी गीत गायन केले.सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले.आभार मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांनी मानले.
यांना केले पुरस्काराने सन्मानित-माढ्यातील यू.एफ. जानराव यांना कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी राज्यस्तरीय शिक्षणमहर्षी महारुद्र चव्हाण जीवन गौरव पुरस्कार,बार्शीच्या सूर्यकांत चोरमुले यांना सानेगुरुजी शिक्षकरत्न पुरस्कार,शेटफळमधील शिक्षिका संगीता पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला शिक्षकरत्न पुरस्कार तर गुंडू पवार यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.
.jpg)
0 Comments