सर्व कृत्रीम रेतनची माहिती शेतकऱ्यांना देण्याची गरज- आ. बबनराव शिंदे
माढा (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या वतीने उत्तम दर्जाची कृत्रिम रेतन पुरवली जात असताना माढा तालुक्यामध्ये खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून जवळपास ७० टक्के कृत्रीम रेतन केली जात आहेत.खाजगी डॉक्टर कुठल्या प्रकारचे रेतन देत आहेत.याबाबत शेतकऱ्यांमध्ये अनभिज्ञता आहे.असे असताना शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व कृत्रीम रेतनची माहिती शेतकऱ्यांना देण्याची गरज असल्याचे मत माढ्याचे आमदार बबनराव शिदे यांनी व्यक्त केले.
माढा शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घघाटन माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रमुख हस्ते पार पडले.उद्गघाटन प्रसंगी आमदार शिंदे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड मिनल साठे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. शिवाजीराव सावंत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षा अॅड मिनल साठे यांनी माढा परिसरात दुग्ध व्यवसायात होत असलेली वाढ पाहता शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची श्रेणी वाढविण्यासंदर्भात आ.शिंदे यांच्या कडे मागणी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लऊळचे पशुधन विकास अधिकारी डॉ सचिन मोरे यांनी केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे,आनंदराव कानडे,माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत,नगरसेवक शहाजी साठे,चंद्रशेखर गोटे,नगरसेविका वंदना लंकेश्वर,उपळाई खुर्द चे सरपंच संदीप पाटील,गुरुराज कानडे,शहाजी चवरे,दत्ता अंबुरे,अमोल चव्हाण, शंभू साठे,सज्जनराव जाधव ,डॉ.आय.जी.शेख,डॉ .विक्रांत बागल,डाॅ.दिपक साळुंखे,डॉ.संजय शेंडगे,डॉ.नाना भोंग,सचिन चवरे,गणेश साळुंखे यांचे सह अन्य नागरिक उपस्थित होते.
0 Comments