Hot Posts

6/recent/ticker-posts

पुन्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2023-2024 साठी अर्ज करावेत

 पुन्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2023-2024 साठी अर्ज करावेत

द्राक्ष पिकांसाठी विमा भरण्याची 15 ऑक्टोबर 2023 अंतिम मुदत

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुन्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन 2023-2024 अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 पासुन फळपिक विमा भरण्यास सुरुवात झालेली असून द्राक्ष पिकांसाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2023 अंतीम मुदत आहे.  सोलापूर जिल्हयात मोठया प्रमाणात द्राक्ष पिकांचे क्षेत्र असून जिल्हयातील सर्वच महसूल मंडळास द्राक्ष पीक नोटीफाईड झालेले आहे.  द्राक्ष पिकांसाठी 16000 रुपये प्रति हेक्टरी शेतकरी  हिस्सा असून शेतकऱ्यांना गारपीट पासून बचाव करण्याकरिता कवच घ्यावयाचे असल्यास अधिक 5333 रुपये प्रति हेक्टरी  इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे.     फळपिक विमा भरले नंतर दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत अवेळी पडणाऱ्या पावसापासुन द्राक्ष पिकाचे संरक्षित करणेबाबत खालील प्रमाणे विमा मंजूर होतो.
*अवेळी पाऊस-
कालावधी तीन प्रकारचे आहेत.... 1) 16 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2) 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर  3)1 डिसेंबर ते 30 एप्रिल.
1.प्रति दिन 4 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास उपरोक्त तीन कालावधी नुसार अनुक्रमे 4100 रुपये, 10600 रुपये व 10900 रुपये
2. प्रति दिन 11 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास अनुक्रमे 6300 रुपये, 15900 व रुपये 21500 रुपये
3. प्रति दिन 21 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास अनुक्रमे 8400 रुपये, 31900 व रुपये 26800 रुपये.
4. प्रति दिन 31 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास अनुक्रमे 10600 रुपये, 48000 रुपये व 42800 रुपये.
5. प्रति दिन 41 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास अनुक्रमे 15700 रुपये, 128600  रुपये व 53000 रुपये.
6. प्रति दिन 51 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास  अनुक्रमे 42200 रुपये, 192000 रुपये व 85500 रुपये अशा पद्धतीने द्राक्ष पिकासाठी पिक विमा मंजूर करण्यात येतो.

सोलापूर जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 7/12, 8 अ, आधारकार्ड व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन जवळच्या सी.एस.सी. केंद्रास दिनांक 15 ऑक्टोबर पुर्वी भेट द्यावी व कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी  संपर्क साधुन पिक विमा हप्ता भरणे बाबत बँक अधिकाऱ्यांशी दिनांक 15 ऑक्टोबर पुर्वी संपर्क करावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना  पिक विमा उतरावा व आपले द्राक्ष पिक संरक्षित करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments