सत्ताधारी महागाई-बेरोजगारीवरून लक्ष विचलित करताहेत-
रोहन सुरवसे-पाटील
पुणे (कटूसत्य वृत्त):- सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकावर झाडत आहेत. मात्र, सत्ताधारी नेमकी हीच संधी साधून महागाईच्या प्रश्नावर सामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत, ही भोळीभाबडी जनता विसरून जात आहे आणि सत्तेच्या सारीपाटाकडे डोळे लावून दिवसभर चर्चा करीत आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी घातक आहे, असा विचार स्वाभिमानी ब्रिगेड अध्यक्ष रोहन सुरवसे-पाटील यांनी मांडला.
सुरवसे-पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुका झाल्या आता तरी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी जाहीरनाम्यातील आश्वासने जुमला आहे का, महागाई-बेरोजगारीचे प्रश्न कधी सोडवणार, मागिल २०१४ च्या निवडणुकीमध्ये १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणार होता, त्याचे काय झाले, आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये सुरू केली. म्हणजे १५ लाख रुपयांचा मुद्दा आता केवळ दीड हजार रुपयांवर आणला, याला नेमके काय म्हणायचे अशी विचारणा जनता करू लागली आहे. सत्ताधाऱ्यांकडून भाविकतेचे मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. भावनिकतेने पोट भरत नाही, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. कृषी प्रधान देशातील शेतकरी, नोकरदार, कष्टकरी कामगारांच्या हितासाठी निर्णय कधी घेणार, महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटण्याऐवजी जटील बनत आहे. कारखानदारी महाराष्ट्रातून बाहेर नेणार आणि तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी बेरोजगार करणार का, युवा पिढीला दिशा दाखवणार की दिशाहीन बनवणार, अशी प्रश्न सामान्यांना पडला आहे. ग्रामीण भागात हाताला काम नाही म्हणून तरुणाई शहराकडे येत आहे, तर शहरातील उद्योगधंदे बंद पडल्याने तेथेही रोजगार मिळत नाही. त्यामुळे पोटपूजा करायची की मुलाबाळांना शिक्षण द्यायचे, अशी व्यथा मजूर अड्ड्यावरील तरुणाई मांडत आहेत. लोकसभेतील सत्ताधारी नेमके कोणासाठी काम करत आहे, असा प्रश्न सुरवसे-पाटील यांनी उपस्थित केला.
0 Comments