Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवरत्न व आयआयटी बझ तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

शिवरत्न व आयआयटी बझ तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न



अकलूज (कटूसत्य वृत्त):- रविवार १३ जुलै रोजी शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज आणि दक्षिण भारतातील नामांकित करिअर इन्स्टिट्यूट 'IIT Buzz' यांच्या संयुक्त विद्यमाने "विद्यार्थी गुणगौरव सोहळा" तसेच "यशस्वी करिअरचा राजमार्ग" या विशेष करिअर मार्गदर्शन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर करिअरच्या विविध संधी, त्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक तयारी, टाळावयाच्या चुका, अभ्यासाची आवड कशी निर्माण करावी, स्पर्धा परीक्षांची तयारी, मोबाईलच्या व्यसनापासून वाचण्याचे उपाय, तसेच वेळेचे नियोजन यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध करिअर कन्सल्टंट व मोटिवेशनल स्पीकर प्रा. राजाराम परब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना दिशा दाखवली.

या प्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करत, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत करण्यात आली.
Reactions

Post a Comment

0 Comments