बांधकाम कामगारांना, प्रमाणपत्र दिलेल्या ठेकेदारांची चौकशी करा ? संघर्ष समितीची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बांधकाम कामगारांसाठी शासन व महामंडळाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, ठेकेदारांकडून ९० दिवसाचे प्रमाणपत्र घेऊन, खोट्या बांधकाम कामगारांनी लाभ घेतला असल्याने, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आणि खरा कामगार बाजूला राहिला आहे. खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ९० दिवसाचे प्रमाणपत्र दिलेल्या ठेकेदारांची सखोल चौकशी करून, दोषींवर कारवाई करा., अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोडू, महिला प्रमुख रेखा आडकी, वैशाली बनसोडे, यांच्यासह कामगार बंधू भगिनींच्या शिष्टमंडळाद्वारे, सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले आहे.
मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्राचे कामगार मंत्री मा. ना.श्री ॲड.आकाश फुंडकर साहेब यांनी बांधकाम कामगार योजनेत होत असलेला भ्रष्टाचार व बांधकाम कामगारांची फसवणूक थांबविण्यासाठी प्रत्येक जिल्हा निहाय चौकशी समितीची स्थापना केली आहे., यामुळे खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळणार आहे. परंतु ज्याप्रमाणे ५ ते ६ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे., ते पाहता खोटे बांधकाम कामगार नोंदणी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही., यात खोट्या बांधकाम कामगारांचे झालेली नोंदणी हे ठेकेदाराच्या ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर झाली आहे., म्हणून आपल्या कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी ज्या ठेकेदारांच्या प्रमाणपत्रावर झालेली आहे. अशा सर्व ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आमच्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
तरी माननीयांनी सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन, सर्व ठेकेदारांची चौकशी करावी., ही विनंती. अन्यथा आमच्या संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.
विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात, संघर्ष समितीचे पदाधिकारी व राधिका मिठ्ठा, सचिन गायकवाड, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, पद्मा मॅकल, सविता दासरी लक्ष्मी गुंटला आदी उपस्थित होते.
0 Comments