"फसव्या भाजपाचा" महादेव जानकर करणार करेक्ट कार्यक्रम ?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्रात आणि राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर ज्या ज्या मित्र पक्षांनी भाजपाला सत्तेत आणण्यासाठी मदत केली त्यांचे पंख छाटण्याचे पद्धतशीर काम भाजपाने व्यवस्थितपणे पार पडल्यामुळे आता भाजपाचा मित्र पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष आणि त्याच्या अध्यक्ष महादेव जानकर सध्या भाजपाच्या विरोधात संपूर्ण राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढून भाजपावर जोरदार प्रहार करत आहेत. प्रत्येक पाच वर्षाला नवीन नेता शोधून जुन्या नेत्याला घरी बसवण्याचा पद्धतशीर डाव भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडूनच होत असल्यामुळे प्रादेशिक पक्ष सध्या अडचणीत सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या अक्कलकोट येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य सभेने धनगर समाजातील मते एक गठ्ठा होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. सध्या महादेव जानकर यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली असून भाजपावर ते सडकून टीका करताना दिसत आहेत. बांधा, वापरा ,आणि हस्तांतरित करा याप्रमाणे या रस्त्याच्या कामाप्रमाणे भाजपा मित्र पक्ष्यांचा मतापुरता सोयीस्कर वापर करून नंतरच्या काळात या पक्षाला आणि त्या पक्षांच्या नेत्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. राज्यात सध्या सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच सर्वसामान्य माणसाला समजत नसल्यामुळे तिसरा पर्याय म्हणून नागरिकांनी रासप ला मतदान करावे असे आवाहन जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आल्यामुळे ते आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागल्यामुळे अक्कलकोट विधानसभा भाजपाला सोपी नसल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना दूर करून नवीन नेत्यांना जवळ केल्यामुळे त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले असून लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर जाळकर यांनी देशातील 543 मतदारसंघात जनस्वराज्य यात्रा सुरू केल्या असून धनगर समाज तसेच इतर बहुजन समाजाला एकत्र करून निवडणुकीत भाजपाला आपली ताकद दाखवून देण्याचा रासपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची संख्या जास्त असल्यामुळे या दोन्ही जागा ताकतीने लढविण्यास रासप तयार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रासपने काढलेली जनस्वराज्य यात्रा फार मोठा चमत्कार करणार यात शंका नाही.
0 Comments