Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्याच्या रणांगणावर शरद पवार रुपी तोफ विरोधी गटाची धडकी भरवणार...?

 राज्याच्या रणांगणावर शरद पवार रुपी तोफ विरोधी गटाची धडकी भरवणार...? 


सोलापूर (दादासाहेब नीळ):- देशाचे नेते तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची सोलापूर ही कर्मभूमी असून एकेकाळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु सत्ता आणि मत्ता हे समीकरण सर्वत्र वेगाने पसरू लागल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच दोन गट पडल्यामुळे राजकीय चित्र वेगळे झालेले दिसत असले तरी  पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी सुद्धा सत्तेच्या पाठीमागे न धावता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याबरोबरच राहणे पसंत  केले आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पवारांचीच  ताकद अधिक असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर हा एकमेव जिल्हा आहे की या जिल्ह्याच्या भोवती गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार या नेत्याने गारुड निर्माण केलेलं आहे. वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना पवारांनी मोठमोठ्या पदापर्यंत जाण्याची संधी दिल्यामुळे पवारांना विशेष मानणारा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे. सत्ता असो अथवा नसो सोलापूर जिल्ह्याचा राजकीय गॉडफादर म्हणून शरद पवारांकडे आजही पाहिले जाते. यातील अनेक कार्यकर्त्यांबरोबर पवारांची थेट नावानिशी ओळख असून त्यांची पकड आजही कायम आहे. सत्तेचा गाजर आणि ईडीच्या भीतीमुळे सध्या अनेक नेत्यांनी पवारांची साथ सोडली असली तरी कार्यकर्ता मात्र पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचे अनेक सभेच्या दरम्यान दिसून आलेलं आहे. पवारांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेष लक्ष नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूरचा दौरा करून वातावरणामध्ये चैतन्य निर्माण केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता पेटून उठला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाची राष्ट्रवादी अधिक सक्षम आणि मजबूत असल्याचे  चित्र आहे. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या रूपाने एक नवा चेहरा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यामुळे पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळणार असा शंभर टक्के आशावाद राजकीय वर्तुळामधून वर्तविण्यात येत आहे. पंढरपूर तालुक्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला ऊत आला असून  परिचारक,  भालके, काळे, पाटील आणि अवताडे गट विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करू लागल्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या तालुक्यावर शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येणार असल्याची चर्चा सध्या पंढरपूर मंगळवेढा भागात होताना दिसत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments