Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल महाविद्यालयाचा युवा महोत्सव संघ रवाना

 लोकमंगल महाविद्यालयाचा युवा महोत्सव संघ रवाना


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाचा युवा महोत्सव संघ स्वेरी पंढरपूर या ठिकाणी होत असलेल्या पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९ व्या  " उन्मेष सृजनरंगाचा " या युवा महोत्सवासाठी रवाना झाला. महाविद्यालयातील युवा महोत्सव समन्वयक प्रा समाधान कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने या वेळी एकूण १८ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला आहे.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशकुमार देवकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला. तसेच इतर विद्यार्थी व उपस्थितांनी ही युवा महोत्सव संघास शुभेच्छा दिल्या.या वेळी महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभाग ( पदव्युत्तर)प्रमुख डॉ किरण जगताप, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख ( पदवी)प्रा अंकुश गोरट्याल, प्रा कविता संभारम,प्रा गौतम जाधव, प्रा तुकाराम जाधव, प्रा डॉ सुप्रतिक पाल चौधरी ,प्रा मोनिका गुंड प्रा सुजित पवार आदी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments