लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा वन्यजीव सप्ताह रॅलीत सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा, राष्ट्रीय सेवा योजना एकक व वन विभाग कार्यालय नान्नज यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य जीव सप्ताह (१-७ ऑक्टोबर) समारोप कार्यक्रम राबविण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यानी नान्नज येथील माळढोक अभयारण्य येथे भेट देऊन तेथील चित्र व भित्तीपत्रके यातुन वन्य जीव व अभयारण्याची माहितीचे संकलन केले. यानंतर वन विभागातील अधिकारी व संपुर्ण विद्यार्थ्यानी नान्नज गावात वन्य जीव सप्ताह निम्मित जनजागृती साठी रॅली काढून जैव विविधता टिकवणे काळाची गरज असल्याचे विविध घोषवाक्याचा वापर करून माहिती प्रचार केला. रॅलीच्या समाप्तीनंतर माळढोक अभयारण्य नान्नज कार्यालय येथे वन विभागातील अधिकारी दाभाडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना माहितीपटाच्या आधारे माळढोक अभयारण्याचे वैशिष्ट्य व वन्यजीव संरक्षण याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय नान्नज येथील प्रमुखा माननीय शुभांगी जावळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जीवन जगत असताना वन्यजीवन व निसर्गाचे समतोल याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थी मनोगत मध्ये कु. प्रज्वल कसबे यांनी माळढोक अभयारण्य भेटीबद्दल मिळालेल्या अनुभवाचे सुंदर अशा शब्दात वर्णन करून सर्वांचे आभार मानले. महाविद्यालय प्रतिनिधी नात्याने प्रा. अजित कुरे यांनी वनविभाग कार्यालय नानज यांच्या सप्ताह रॅली व अभयारण्य भेटीच्या नियोजनाबद्दल श्री. फडतरे साहेब, श्री. म्हस्के साहेब, बढे मॅडम व त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. सदरील रॅलीसाठी लोकमंगल कृषी महाविद्यालय, लोकमंगल व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय आणि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या रॅलीसाठी महाविद्यालयातर्फे प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. ज्योती जाधवर आणि प्रा. स्मिता धायगुडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
0 Comments