-राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शिलेदार माढा लोकसभेवर विजयाचा गुलाल उधळणार...!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुर्डवाडी येथे पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षात जुने चेहरे पाहून कंटाळा आला होता ते ईडीच्या भीतीने निघून गेले त्यामुळे पक्षात आता नव तरुण शिलेदारांना संधी मिळणार असून माढ्याचा गड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शिलेदार पुन्हा एकदा जिंकून इतिहास निर्माण करणार अशी गर्जना सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
0 Comments