पटवर्धन कुरोली मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 27, 2023

पटवर्धन कुरोली मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण...

 पटवर्धन कुरोली मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण...

अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा

 आरक्षण उपोषणाला समर्थन करण्यासाठी आजपासून पटवर्धन कुरोली येथे

 आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषणाला सुरुवात झाली.


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पटवर्धन कुरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चक्रीय उपोषणाला शांततेच्या मार्गाने सुरुवात केली.दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जोर धरताना दिसत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये सामील करून 50 टक्के च्या आत मध्ये आरक्षण देऊन आंदोलनात युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे असे मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. याच गोष्टींला पाठिंबा देण्यासाठी पटवर्धन कुरोली येथे आजपासून चक्रीय उपोषणाला सुरुवात केली. तसेच गावांमध्ये आरक्षणमिळे पर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी गावात येण्यास बंदी घातली आहे.यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुस्लिम समाज, सकल नाभिक समाज,लिंगायत समाज,तसेच दलित समाज यांच्या कडून एक मोठा भाऊ म्हणून पाठिंबा देण्यात आला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापच,कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मराठा समाजातील समाजबांधव हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages