वारी कालावधीत वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे प्रांताधिकारी-गजानन गुरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 18, 2023

वारी कालावधीत वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे प्रांताधिकारी-गजानन गुरव

 वारी कालावधीत वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे प्रांताधिकारी-गजानन गुरव


 

 

          पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी असून, यात्रा कालावधी दि.14 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

                  कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत प्रांताधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मोहोळचे प्रांताधिकारी. अजिंक्य घोडगे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री  ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, सहा. पोलीस निरिक्षक कपिल सोनकांबळे तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

            यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले,  यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता व पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे, धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी . शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासनाने  संयुक्त पथकाची नेमणूक करावी. वाहनतळाची स्वच्छता व पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी. अन्न औषध प्रशासन विभागाने मठात शिजविण्यात येणाऱ्या अन्नाची तसेच शहरातील हॉटेलची वेळोवेळी तपासणी करावी.

आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे.कार्तिकी यात्रा कालावधीत दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. दर्शनरांगेत व दर्शन मंडपात भाविकांना स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था करावी. दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही यासाठी मंदीर समिती व पोलीस प्रशासनाने  अवाश्यक उपाययोजना कराव्यात.पोलीस प्रशासनाने  वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये  याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही प्रातांधिकारी गुरव यांनी दिल्या.

             यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री शेळके म्हणाले,  यात्रा कालावधीत भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सुलभ व जलद दर्शन व्हावे याबाबत नियोजन करण्यात आले असून, दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदीर व मंदीर परिसर येथील वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी  तसेच भाविकांना आवश्यक सुविधांसाठी मंदीर समिती स्वच्छता कर्मचारी तसेच 1 हजार 60 स्वयंसेवक उपलब्ध राहणार आहेत. लाईव्ह दर्शन व्यवस्था, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्था, भाविकांची अपघात विमा पॉलीसी वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, मोफत चहा व खिचडी वाटप आदी व्यवस्था भाविकांना मंदीर समितीकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

               यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील नादुरुस्त बोअरवेलची तात्काळ दुरुस्ती करण्यात येणार आहे. शहरातील स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची  नेमणूक करण्यात येणार आहे. 65 एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी  पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages