मोहोळ तालुका माझा लई भला, गाव शिरापूर सांगतय तुला आलो रे
आरक्षण मागायला..!
खेळ मांडियेला आरक्षणाचा, जमले मराठा बांधव रे..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुनश्च उपोषणास बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ 25 ऑक्टोबर पासून मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये शिरापूर गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने काल आंदोलन करण्यात आले. खेळ मांडियेला आरक्षणाचा, जमले मराठा बांधव रे.. या दशरथ वराडे यांनी गायलेल्या अभंगाने मराठा तरुणांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण केले.
या आंदोलनामध्ये शिरापूर भजनी मंडळातर्फे भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रख्यात भारुडकार दशरथ वराडे, बाळासाहेब हारदाडे, अशोक काळे, मुळे महाराज पापरी, मोहोळ आंदोलनाचे संयोजक बाळासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड , नागेश भोसले ,प्रमोद डोके, सत्यवान देशमुख, मुकेश बचुटे, सोमनाथ पवार, मनोज मोरे, यांच्यासह शिरापूर सरपंच वृषाली सावंत, विजया तकमोगे ,साविता मसलकर, मीनाक्षी चव्हाण कृतांजली चव्हाण ,धनश्री चव्हाण, वणमला चव्हाण, कौशल्य रोमन. तारामती रणदिवे, सुनंदा चव्हाण, नंदा चव्हाण, माधुरी चव्हाण, सोनाली चव्हाण, मनीषा चव्हाण, सविता जाधव, स्वाती काळे, अश्विनी काळे, नीलम मसलकर ,अश्विनी मसलकर, अनंदी काळे, उपसरपंच सौदागर साठे ,प्रकाश काळे, दिगंबर मसलकर, अनिल पाटील, नाना सावंत, सागर काळे, नवनाथ मसलकर, श्रीकांत पाटील, उमेश रोमन, दशरथ काळे, ज्ञानेश्वर रोमन, हरिभाऊ दळवे, आधी सह सकल मराठा बांधव शिरापूर हे उपस्थित होते.
एक वर्षाच्या चिमुकलीचाही सहभाग.मोहोळ येथील मराठा आंदोलनामध्ये शिरापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आपल्या लहान मुलांसह सर्व महिला या उपोषण स्थळी जमल्या होत्या .यामध्ये एक वर्षाची ईश्वरी नवनाथ मसलकर ही चिमुरडी पण सहभागी झाली होती.


0 Comments