Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज नगरपरिषदेचा आंधळा कारभार जनतेसमोर "मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित"

 अकलूज नगरपरिषदेचा आंधळा कारभार जनतेसमोर

"मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित"



अकलूज(कटूसत्य वृत्त):- अकलूज नगरपरिषदेचा सध्या आंधळा आणि मनमानी कारभार सुरू असून अकलूज नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.तर त्यांच्या अकलूज नगरपरिषद कार्यकाळातील वेगवेगळ्या विकास कामांची कसून चौकशी करण्यात यावी अशी दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे.

 अकलूज हे गाव आशिया खंडातील अत्यंत नावजलेले गाव समजले जात होते? तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत असताना, अकलूज ग्रामपंचायतीचा रुबाब काही वेगळाच होता.गावचे सौंदर्य माणसा माणसाच्या मनाला भावणारे असेच मनमोहक होते,या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक यांची वर्दळ सतत असते, आणि याला कारणही तसेच होते स्वच्छ आणि सुंदर अकलूज.!

       अगदी दोन वर्षांपूर्वीच अकलूज नगरपरिषदेचा जन्म झाला आणि तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतच्या विचारांचे अंतिम संस्कार झाले. अर्थात काय तर तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतच्या विचारांचा विसर पडत गेला.अकलूज नगरपरिषद होताच जनतेच्या अपेक्षा वाढत गेल्या! परंतु या दोन वर्षात जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला. कारण लाखो रुपये खर्च करून गल्लीबोळात बनवलेले रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे तयार करण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी वेळीअवेळी, कधी दोन दिवसाआड कधी तीन दिवसाआड असेच होत आले आहे. पाण्यात रेतीचे प्रमाण अधिक यामुळे किडनी स्टोनचा धोका नाकारता येणार नाही? गावात केलेल्या बंदिस्त गटारे निकृष्ट दर्जाचे काम, कचऱ्याची गाडी गल्लीबोळात वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे कचरा घरातच दोन दोन दिवस ठेवावा लागतो आणि रोगास निमंत्रण द्यावे लागते. दलित वस्ती मध्ये पिण्याच्या पाण्याची वेळ वेगळी आणि अन्य वस्तीमध्ये त्यांच्या सोयीनुसार! रस्त्यावरील वाढते अतिक्रमण अर्थात कोणीही यावे टपरी टाकून व्यवसाय करावे अशी आहे. भाजी मंडईतील पडलेले रिकामे गाळे आणि त्या ठिकाणी चालणारे बेकायदेशीर धंदे तर याकडे बघून आंधळ्याचे सोंग घेतले आहे तर याला खत पाणी नगरपरिषदचे कर्मचारी घालत आहेत?

दलित वस्ती मध्ये पाच पाच फूट खड्ड्यातून पाणी काढावे लागते आणि अन्य वस्तीमध्ये याची गरजच भासत नाही. येथे भेद भावाला मर्यादाच राहिला नाही.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते हे अकलूज शहराचा विकास शेवटच्या घटकापर्यंत  व्हावा म्हणून अकलूज नगर परिषदेला निधीची कधीच कमतरता भासू दिली नाही  असे असताना जनतेच्या अपेक्षांना नगरपरिषदेकडून मूठमाती देण्यात आली आणि याला कारणीभूत सध्याचे अकलूज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे हेच असल्याची  चर्चा जनतेत  आहे. म्हणून त्यांच्या अकलूज नगरपरिषद कार्यकाळातील सर्व विकास कामांची शासनाने सखोल चौकशी करावी अशी जनतेची मागणी आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments