राहुल गांधींचे उज्वल भविष्य विरोधकांना स्वप्नांमध्ये दिसत आहे
"काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांचा भाजपवर निशाणा"
पुणे (कटूसत्य वृत्त):-राहुल गांधींचे उज्वल भविष्य विरोधकांना स्वप्नांमध्ये दिसत असून विरोधकांची आत्ताच झोप उडू लागली आहे असा निशाणा प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी भाजप वर साधला.
पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की येणारा काळ हा निवडणुकांचा आहे आणि भाजपला जड जाणारे व्यक्तिमत्त्व नेतृत्व राहुल गांधींचं आहेत.म्हणून भाजप पक्ष वारोंवार राहुल गांधी यांच्या विरुद्ध षडयंत्र रचत त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राहुल गांधी हे उच्च विद्याविभूषित आहेत. अनेक राज्य त्यांनी भारत जोडो यात्रेच्या वेळी पायी चालत पाहिले आहेत तेही जनतेशी संवाद साधत ते मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या अत्यंत भक्कम आहेत. राहुल गांधीच्या चेहऱ्याचा वापर इतर ठिकाणी वापरण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या समोर आना,आणि त्यांना सांगा जनतेच्या विश्वासास पात्र राहणारे खरे नेतृत्व राहुल गांधींचं आहेत आणि उद्याचे भविष्य तेच आहेत. हिंमत असेल तर सांगा!
जनतेचे भक्षण करणारा रावण असतो पण रक्षण करणारा हा रावण नसतो. भाजपाने कितीही राहुल गांधी यांच्या वरती, काँग्रेस वरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यांची खरी जागा जनताच आगामी लोसभेच्या निवडणुकीत दाखवतील यात शंका नाही.म्हणूनच असे चाळे भाजप नेते करू लागले असल्याचे मत प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांचे बोलताना व्यक्त केले.

0 Comments