मोहोळ मधील डेंगू परिस्थितीवर
मोहोळ शहर काँग्रेसच्या मागणीवर तात्काळ बैठक
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी मोहोळ शहर काँग्रेसच्या म मागणीवरून तात्काळ बैठक लावली मोहोळ मध्ये डेंगू सदृश्य आजाराचे पेशंट वाढत असून यासंदर्भात काल मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर राजे पवार ओबीसी चे जिल्हा उपाध्यक्ष बिलाल भाई शेख यांनी मोहोळ नगरपरिषद येथे जाब विचारला असता तेथील गैर कारभारावरतीच लक्षात आल्यानंतर मोहोळ तहसीलदारशी चर्चा करून तात्काळ बैठक लावण्यात आली या बैठकीला मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके मोहोळचे आरोग्य अधिकारी अरुण पाथरूड मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या एम एस विदुला बाबर मॅडम मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर राजे पवार मोहोळ ओबीसी चे जिल्हा उपाध्यक्ष हाजी बिलाल भाई शेख महिला तालुकाध्यक्ष अंजलीताई वस्त्रे किसान सेलचे जिल्हा उपप्रमुख नानासाहेब मोरे तालुका उपाध्यक्ष महादेव शिंदे संतोष शिंदे विकास देशपांडे लहुजी शक्ती सेना मोहोळ शहर अध्यक्ष राजाभाऊ आष्टूळ भैय्यासाहेब काळे तसेच सामाजिक कार्यकर्ते शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments