Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी

 लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कलाम यांच्या शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी काम करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे हा या दिवसाचा उद्देश. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनी प्रियंका वळसे व विद्यार्थी संचित कांबळे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवन प्रवास सांगितला. डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये बहुमोल योगदान आहे देशाच्या लष्करी क्षेपणास्त्र नागरी अंतराळ कार्यक्रमांमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते असे मनोगत प्रा. प्रवीण शेळके यांनी व्यक्त केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते तर उत्तम लेखक सुद्धा होते.  अग्निपंख, मिशन इंडिया, इगनायटेड माईंडस ही त्यांची पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत असे आवाहन प्रा. गणेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या बालपणातील काही किस्से विद्यार्थ्यांना सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदर्श ठेवून एक चांगलं व्यक्तिमत्व  घडण्यासाठी प्रयत्न करावेत असे विद्यार्थ्यांना संबोधीत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सत्यजित देवकर व आभार प्रदर्शन शुभम खोमणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments