जो तन आणि मन जपतो तोच योगी बनतो
-ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर
वैराग (कटूसत्य वृत्त ):-मन आणि शरीर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनापासून भक्ती आणि तनापासून व्यायाम कराल तर भक्ती युक्त आरोग्य तुम्हाला दीर्घायुष्य मिळवून देईल. जो तन आणि मन जपतो तोच योगी बनतो, असे मार्गदर्शनपर विचार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मानेगाव (धा) (ता.बार्शी) येथे सेवानिवृत्त प्राचार्य योगीराज ताटे-देशमुख यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाभक्ती आरोग्यपर्व सोहळ्यामध्ये केले.
यावेळी ह.भ.प. निवृत्ती महाराज व त्यांच्या पत्नी ह.भ.प. शालिनीताई देशमुख यांचे कीर्तन देखील यावेळी झाले .यावेळी मानेगावमध्ये रक्तदान शिबिरामध्ये 51 जणांनी रक्तदान केले. तसेच मॅक्स केअर मल्टिस्पेशल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. याशिवाय विविध उपक्रम राबविण्यात आले . सेवानिवृत्त प्राचार्य योगीराज ताटे - देशमुख यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाभक्ती आरोग्य पर्वामध्ये ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर , योगीराज ताटे, पोनि पृथ्वीराज ताटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी सामाजिक विषयांना छेडताना इंदुरीकर महाराजांनी दारूचे व्यसन करू नका, आई-वडिलांची सेवा करा, वृक्ष लागवड करून आरोग्य सदृढ करा, व्यक्ती मयत झाल्यावर त्यांची राख कपडे पाण्यात न टाकता शेतात टाका असेही मार्गदर्शन केले.

No comments:
Post a Comment