विशाल दुर्लेकरचा घात करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी शशिकांत चव्हाण यांची पत्रकार परिषदेतून मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 17, 2023

विशाल दुर्लेकरचा घात करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी शशिकांत चव्हाण यांची पत्रकार परिषदेतून मागणी

 विशाल दुर्लेकरचा घात करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी

शशिकांत चव्हाण यांची पत्रकार परिषदेतून मागणी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील रविवार पेठ येथील मल्लिकार्जुन नगर येथील अपार्ट मेंट मध्ये मित्राचा फोन आल्यानंतर विशाल दुर्लेकर गेला. त्यानंतर रात्री त्याचा बाहेरील खिडकीला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकाला समजली. ही संपूर्ण घटना अतिशय धक्कादायक असून हा अपघात नसून घातपात झाला असल्याची माहिती विशालचे मामा शशिकांत हणमंतू चव्हाण  यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, " दिनांक एक ऑक्टोबर 2023 रोजी रात्री साडेनऊ ते दहा च्या दरम्यान विशालला मोबाईलवर मित्राचा फोन आल्यानंतर तो घरातून निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता विशालचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला असल्याची बातमी आमच्या कानावर आली.ही बातमी ऐकून खरंच आम्हाला शॉक बसला. कारण उच्चशिक्षित असणारा माझा भाचा विशाल हा आत्ताच आर्किटेक्चर झाल्यामुळे स्वतःच्या पायावर उभारला होता.  अतिशय गरिबीमुळे  मी त्याचा आज पर्यंत पालनपोषण केलं होतं .आणि त्यानंतर आता कुठे चांगले दिवस आले होते .अचानक विशाल आमच्यातून निघून गेला. अतिशय मितभाषी स्वभाव असणारा विशाल गल्लीतील प्रत्येकाला मदतीचा हात देत असे आणि त्यामुळे विशाल जवळील पैसे घेण्यासाठीच कट रचून त्याला या लोकांनी संपवून इलेक्ट्रिक शॉक लागला असल्याचे कांगावा केला आहे.कारण ज्या खिडकीला हात लागून मृत्यू झाला असे सांगितले जात आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वायर नाही त्यामुळे हा मृत्यू अतिशय समस्यास्पद आणि संधीग्ध असल्यामुळे पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्रामाणिकपणे करावा.ही घटना मल्लिकार्जुन नगर परिसरामध्ये पहाटे  2: 30 च्या दरम्यान घडली असून एक महिला व चार पुरुष असे मिळून विशालला अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे घेऊन गेले. मल्लिकार्जुन नगर शहरात असतानाही शहरातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता एक दिखावापणा म्हणून कुंभार येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये टू व्हीलर वर घेऊन गेले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ईसीजी रिपोर्ट आणि डॉक्टरांनी तपासणी केली असता विशालचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. विशालचा अपार्टमेंट मध्ये मृत्यू झालेला असतानाही आरोपींनी आम्ही याला मारले नाही.  हे दाखवण्यासाठी पाचही आरोपी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेलेत. विशेष म्हणजे यावेळी विशालच्या मृत्यूची नातेवाईकांना कोणतीही माहिती किंवा कल्पना देण्यात आली नाही. त्यानंतर विशाल चा मृत्यू झाल्याचे घोषित केल्यानंतर सुद्धा हे पाच आरोपी विशालला मार्कंडेय सहकारी सहकारी रुग्णालयात घेऊन गेले. मार्कंडेय रुग्णालयाला आणण्यापूर्वी मृत्यू झाला असेल तर पीएम साठी सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यासाठी वळसंग पोलिसांकडून फोनद्वारे सांगण्यात आले. त्यामुळेच हा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झालेला नसून या पाच जणांनी विशालचा घात केला  असून हे निष्पन्न झाले असून विशालला शॉक देऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने पाच पैकी दोन  आरोपी  मार्कंडेय रुग्णालय येथे ऍडमिट करून पळून गेले.त्यामुळे हा मृत्यू अतिशय संशयास्पद झाला असून ही घटना घडवून घटनास्थळी अजूनही एकाही महापारेषण अधिकाऱ्याने भेट दिली नाही अथवा साधी चौकशी केली नाही. घटनास्थळाची पाहणी केली असता स्वाद बसण्याचा संबंध येत नसून फ्रॉक बसविण्यासाठी विशाल वर प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते त्यामुळे विशाळ जवळील रोख रक्कम त्या महिलेला देताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.त्यामुळे विशालचा अपघात झाला नसून घात केला आहे हे उघड झाल्या असून या निष्पाप मुलाला मारणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून एफ आय आर दाखल करण्यात यावा.  अशी मागणी यावेळी शशिकांत चव्हाण यांनी शेवटी बोलताना केली


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages