आमच्या जमिनी आम्हाला परत द्या,
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो
पोलिसांकडून न्याय मिळण्याऐवजी होतोय अन्याय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी देगाव या भागातील शेतकऱ्यांच्या सन 1974 रोजी मूळ मालक कब्जे वहिवाटीदार यांच्या जमिनी उजनी धरणग्रस्त च्या नावाखाली काढून घेण्यात आल्या. त्यानंतर या जमिनी पाच वर्षाच्या आत विना वापर विल्हेवाट लावडे गरजेचे असताना, या जमिनी मूळ मालकाला परत देण्याचा कायदा असताना सुद्धा परत दिल्या नाहीत. त्यामुळे त्या जमिनी मूळ मालक शेतकऱ्याला परत देण्यात याव्यात अशी मागणी बेलाटी ,देगाव शेतकऱ्यांनी केल्या असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. सन 1974 ते आजपर्यंत या जमिनीचा कब्जे वहिवाटदार आम्हीच मूळ मालक शेतकरी असून या जमिनीचा ताबा आमच्याकडेच असताना व या जमिनीत आम्हीच खंड भरले असताना केवळ सातबारा उताऱ्यावर तिराईत लोकांच्या नावे लागल्याच्या कारणावरून सलगर वस्तीचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी जबरदस्तीने आम्हा सर्व शेतकऱ्यांचा कब्जा काढून घेत आहेत. परंतु आम्ही सदर तिराईत व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यास गेलो असता आमचे म्हणणे न ऐकता उलट आम्हालाच नाना प्रश्न विचारून आम्हाला पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या यासाठीच आम्ही हे धरणे आंदोलन करत असून आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही यापुढे आमरण उपोषण करणार असल्याचे माहिती यावेळी आंदोलन करते हरिदास हुणचिकट्टी, विजू पाटील, शिवाजी शंकर सोनटक्के, राजकुमार पाटील, शिवाजी वावरे यांनी दिली.
.jpg)
No comments:
Post a Comment