शिक्षणमहर्षी महारुद्र (मामा) चव्हाण यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद : प्रा. सावंत
माढा (कटुसत्य वृत्त): - माढा तालुक्यातील केवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा २७ वा वर्धापन दिन व संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण यांचा ६६ वा वाढदिवस सोहळा निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माढा नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष ॲड. सौ मीनल साठे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलतज्ञ अनिल पाटील ,कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. श्री सुहास काका पाटील, सोलापूर जिल्हा आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा. श्री महेश कुमार सरवदे सर, उपनगराध्यक्षा सौ कल्पना ताई जगदाळे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. केवडसारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा गावामध्ये शिक्षण संस्था उभी करणे खूप मोठे अवघड काम आहे आणि त्यामध्ये आश्रम शाळा उभी करून चालवणे त्यांचे पालकत्व स्वीकारणे हे मामांनी खूप मोठं कार्य या ठिकाणी केलेले आहे. त्यांचे हे कार्य खूप कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी काढले. ॲड मीनलताई साठे यांनीही संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हणाले. यावर्षी प्रथमच संस्थेच्या वतीने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चार व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिक्षण महर्षी महारुद्र मामा चव्हाण राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार माढा येथील डॉ.यू. एफ.जानराव यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल साने गुरुजी राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार बार्शी चे श्री .सूर्यकांत मल्लेशी चोरमले यांना हा पुरस्कार देण्यात आला. याच बरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय महिला शिक्षकरत्न पुरस्कार जिल्हा परिषद शाळा शेटफळ ता.मोहोळ येथील शिक्षिका श्रीमती संगीता वामन पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते श्री गुंडू रंगराव पवार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र , मानाचा फेटा व महावस्त्र असे होते. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या मार्फत शाळेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जाते यावर्षी ५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. वर्धापन दिनानिमित्त चित्र प्रदर्शन हा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. शाळेतील इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी श्वेताली राजेंद्र धर्मे व इयत्ता १२ वी अपर्णा चव्हाण या दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद आप्पा कानडे, स्वराज शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फत्तेसिंह पवार, माजी पंचायत समिती सदस्य हनुमंत दादा पाडोळे,संस्थेचे अध्यक्ष अर्जुन लटके, उस्मानाबादचे तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके, माढा आश्रम शाळेचे संस्थापक सचिव महेश हरहरे, केवड ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील उपसरपंच नितीन पाडूळे ,उंदरगाव चे सरपंच प्रतिनिधी राजाभाऊ लवटे, अरुण नाईकवाडे, मा दिपक आरे , रामभाऊ मस्के ,डॉ विकास मस्के माजी उपसरपंच दत्तात्रय लटके, ग्रामपंचायत सदस्य अमोल लटके, माजी सरपंच सुनील धर्मे, टेंभुर्णी चे भारत माने, बावी चे मोरे महाराज, केवड गावातील ग्रामस्थ पालक व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री गणेश चव्हाण सर व शाळेचे व्यवस्थापक माननीय श्री कालिदास चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक घाडगे सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांनी मांडले.

0 Comments