प्रेम प्रकरणातुन व्यापारी महेंद्र शहा हल्ला प्रकरण-मुलीसह तिचा
प्रियकरासह ६ संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत-महेंद शहा हे
शुद्धीवर नाहीत -शुद्धीवर नसल्याने जबाब बाकी
माढा (कटूसत्य वृत्त):- प्रेम विवाहाला विरोध करीत असल्यामुळे जन्मदात्या वडिलांचेच पाय तोडण्याची मुलीने प्रियकराच्या मदतीने सुपारी दिल्याच्या घटनेने माढा शहर हादरले होते. या हल्यात गंभीर जखमी असलेले व्यापारी महेंद्र शहा यांची प्रकृती अजुन ही चिंताजनक अशीच आहे.
व्यापारी महेंद्र शहा यांना मारहाण केल्या प्रकरणात शहा यांची मुलगी साक्षी शहा हिच्यासह प्रियकर चैतन्य कांबळे व अन्य अश्या एकुण ६ संशयिता विरुद्ध ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सहा जण सोलापूर मधील कारागृहात आहेत.सध्या ६ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडीत असल्याने बार्शी सेशन कोर्टात जामिन ठेवता येतो.मात्र अजुन संशयित आरोपीनी कोर्टासमोर जामिन अर्ज ठेवलेला नाही.महेंद्र शहा यांच्यावर जीवघेणा हल्ला मुलीनेच घडवला होता.शहा यांचेवर सोलापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शहा यांचे व्हेटीलेटर काढण्यात आले आहे.मात्र ते शुद्धीवर आले नसल्याने त्यांचा पोलिसांना जबाब घेणे अजुनही शक्य नाही.महेंद शहा यांच्या पत्नीने घडलेल्या घटनेविषयी पोलिसांना जबाब दिलाय.त्यात साक्षी विषयी कठोर शब्दात जबाब दिल्याचे सांगण्यात येत आहे. माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस.खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मोहम्मद शेख हे घटनेचा कसुन तपास करीत आहेत.
.jpg)
No comments:
Post a Comment