मराठा आंदोलकांवर पोलिसांचा अमानुष बेछूट लाठीमार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

मराठा आंदोलकांवर पोलिसांचा अमानुष बेछूट लाठीमार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड..!

 मराठा आंदोलकांवर पोलिसांचा अमानुष बेछूट लाठीमार म्हणजे

 जालियनवाला बाग हत्याकांड..!



सोलापूर (दादासाहेब निळ):- गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने 48 मूक मोर्चा काढले एवढेच नव्हे तर या मोर्चा ची नोंद संबंध देशाला घ्यावी लागली एवढी शांतता मोर्चेकर्‍यांनी पाळली होती. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावांमध्ये गेल्या चार पाच दिवसापासून लोकशाही मार्गाने अतिशय शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू होते. अचानकपणे पोलिसांनी येऊन या आंदोलकांवर बेछुट आणि अमानुष लाठी चार्ज  केल्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. ही घटना म्हणजे अमृतसर जिल्ह्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ज्याप्रमाणे इंग्रजांनी घडवून आणून हा माणूस अशा प्रकारचा गोळीबार करून अनेक भारतीयांना जखमी केलं होतं त्याची आठवण करून देणारी आजची ही घटना शिंदे फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत घडल्यामुळे आजचा काळा दिवस कोणीच विसरू शकत नाही.
मराठा समाजाची फसवणूक करून या फडणवीस गृहमंत्र्यांनी एकदा नव्हे दोनदा मते मिळवली परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मात्र काडीचा प्रयत्न केला नाही त्यामुळेच मराठा बांधव रस्त्यावर उतरतोय. आपल्या हक्कासाठी न्यायासाठी भांडतोय. आणि हे गरिबांचे सरकार असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत हीच खऱ्या अर्थाने फार मोठी शोकांतिका आहे. राज्यकर्त्यांनी आजपर्यंत या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळेच ही घटना घडली आणि या घटना घडण्या पाठीमागे पडद्यामागचा सूत्रधार म्हणजे सरकार आहे अशा प्रकारच्या भावना सध्या राज्यभरातून उमटू लागले आहेत.
लाठीमार सुरू होताच उपोषण स्थळी प्रचंड मोठा गोंधळ उडाला आणि चंद्राचेंगरी मध्ये लहान बालक आणि महिला सह अनेक आंदोलक जखमी झाले. अनेकांची डोकी फुटली. पोलिसांनी गोळीबार केला .त्यामुळेच आंदोलनाला हिंसक वळण लागले,  अन्यथा आज पर्यंत मराठा समाजाचं आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच सुरू होत. परंतु आजची ही घटना या सरकारच्या आदेशावरूनच झाले असून पोलिसांनी सरकारच्या आदेशाशिवाय लाठीमार करणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
मराठा समाजाचा जुना करून या सरकारच्या लक्षात न आल्यामुळे ची घटना घडली. अनेक तरुण बेमुदत उपोषण करत होते अनेक आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती तर सरकारने या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याऐवजी पोलिसांकडून लाठी मार करायला लावणं हीच खऱ्या अर्थानं या देशाच्या इतिहासात आजवर लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट असल्याचं दिसून येत आहे. उपजिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना या आंदोलनाचे आयोजक मनोज जरांगे पाटील  या आंदोलक कार्यकर्त्यांची जास्तच काळजी होती तर त्यांनी या अगोदर येऊन त्यांची भेट घेणं गरजेचं होतं. परंतु मोठा पोलीस फौज फाटा घेऊन ते आंदोलन स्थळी दाखल झाल्यामुळेच आणि लाठीचार्ज केल्यामुळे या आंदोलनाला वेगळं वळण लागला असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे. वास्तविक पाहता गावात आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होत. अचानकपणे घटनास्थळी 200 ते 300 पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी आंदोलन स्थळी जाऊन कार्यकर्त्यांना समजावून सांगणे गरजेचे असताना  आंदोलनाचे आयोजक मनोज जरांगे पाटील यांना पोलीस अचानकपणे ताब्यात घेण्याचा डाव टाकत असल्यामुळेच आंदोलन भडकलं,  अन्यथा आंदोलन शांततेने उपोषण करत होते. लोकशाही मार्गानं शांततेत चाललेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी अचानकपणे एक बळाचा वापर करत मिठाचा खडा टाकला आणि त्यामुळेच ही ठिणगी पेटली असल्याचं आंदोलन कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. आमचा नेता जर पोलीस ताब्यात घेत असतील तर आमच्या आंदोलन मोडणार या भीतीने आंदोलन कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी मनोज पाटील यांना संरक्षण कडं केलं. त्यामुळे पोलिसांनी संतापून अमानुषपणे लाठीचार्ज सुरू केला त्यामुळेच आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटून उठले.त्यानंतर पोलिसांनी कसल्याही प्रकारची दयामाया न दाखवता अगदी क्रूरपणे जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणेच लहान मुले आणि महिलांवर मोठ्या प्रमाणात लाठी मार केला.  अश्रुधाच्या नळकांड्या फोडल्या. एवढेच नव्हे तर हवेत गोळीबार केला आणि काही गोळ्या अनेक आंदोलकांना लागल्यास सुद्धा..! लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला आरक्षण द्या म्हणून उपोषण करणाऱ्या मराठा समाज बांधवांचे काय चुकलं होतं..! पोलिसांनी अशा प्रकारचा अमानु ष लाठी चार्ज करण्यामागचं कारण काय..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनाच अगोदर आंदोलनकर्त्यांनी मारहाण केल्याचं सांगून आंदोलनकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडून आलाय. मनोज जरांगे- पाटील  29 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाला बसले होते. अतिशय लोकशाही मार्गाने हे उपोषण सुरू असताना हे आंदोलन सरकारने पोलिसांकडून चिरडून टाकलं आणि हवेत गोळीबार करून एक प्रकारे आंदोलन मोडण्याचा प्रकार केल्यामुळे या मुजोर सरकारच्या आदेशानेच पोलिसांनी हे कृत्य केलं त्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देणे ही खऱ्या अर्थानं नैतिक जबाबदारी आहे अन्यथा मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना आषाढी वारी ला या कडव्या मराठा बांधवांनी तीव्र आंदोलन करून पंढरीला येण्यापासून रोखलं होतं. आणि त्यामुळेच मराठा समाज आणि तरुणांवर त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गुन्हे दाखल केले होते. एकंदरीत मराठा समाजाविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये तेव्हापासूनच फार मोठी तिरस्काराची भावना होती. एक मराठा लाख मराठा, शांत असलेल्या मराठा समाजाला डी वचू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असं मराठा बांधव रस्त्यावर येऊन सांगत होता तरीसुद्धा पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलनामध्ये लाठीमार करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यामुळेच त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. पोलिसांनी संतापाच्या आणि रागाच्या भरामध्ये घरामध्ये बसलेल्या आणि शेतातून कष्ट करून आलेल्या महिलांना सुद्धा अमानुष मारहाण केल्यामुळे ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मला चालता येईना बोलता येईना,...   काहीच करता येईना,  ....माझा पाय सुद्धा उचलेना,.. या पोलिसांनी माझ्या छोट्या छोट्या नातवांना सुद्धा लाठीने बेदम मारलं, आता आम्ही कराव तरी काय.. अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया महिलांनी सुद्धा दिल्या. दिवसभर शेतात कष्ट करून घरी येत असताना पोलिसांनी मला सुद्धा काहीच माहिती नसताना मारहाण केली.  असं एका महिलेने सांगितलं. नेमकी मारहाण का करत आहात अशी विचारपूस करत असताना पोलिसांनी अचानकपणे बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केल्यामुळे आम्हाला कुठे पळावं काय कळत नव्हतं असं त्या गावातील बाळू तारक यांनी सांगितलंय.  एकंदरीत जालना जिल्ह्यातील सराटी गावातली ही घटना म्हणजे माणुसकीला कलंक लावणारी घटना असून ब्रिटिशांनी सुद्धा जालियनवाला बाग हत्याकांड करत असताना लहान मुलं आणि वृद्ध माणसांवर थोडीशी दया दाखवली असेल..! परंतु आमच्याच सरकारने आज आमच्याच घरावर गोळीबार केला. लहान मुलांवर सुद्धा  लाठी चार्ज केला. त्यामुळे ब्रिटिशांपेक्षा अतिशय माणुसकी हिन आणि माणुसकीला काळीमा फासणारं...  हे सरकार  आणि पोलीस..!
उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करा असा देश पोलिसांना कोणी दिला..?
कोणाच्या आदेशाने पोलिसांनी उपाशीपोटी बसलेल्या तरुणांवर लाठी चार्ज केला..?
पोटात अन्नाचा  कण नसताना त्यांच्या हातात दगड कुठून आणि कसे आले..?
शांतते इथे चालणाऱ्या आंदोलनाला शुंसक वळण देण्याचे आंदोलन चिरडण्याचे आदेश कोणी दिले..?
या घटनेचा गांभीर्य आणि तपास झाल्याशिवाय आणि दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय मराठा समाजाचा गप्प बसणार नाही.

या अमानुष आणि क्रूर घटनेमागचा पडद्यामागचा खरा सूत्रधार शोधून काढण्याची मागणी मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages