उप सभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी घेतले
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी आज श्री विठ्ठलाची नित्यपुजा करुन श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी उपस्थित होत्या. तसेच मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नित्योपचार विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.
श्री. विठ्ठलाच्या पूजेवेळी श्रीमती. अनुसया फसळकर यांनी म्हटलेला काकडा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना प्रचंड भावला असून, शक्य असल्यास मंदिर प्रशासनाने या काकड्याचे शब्दांकन करावे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच घरामध्ये पिढ्यानपिढ्या श्रावण महिन्यात पंढरपूरच्या श्री. विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे. त्यानिमित्ताने आज विठ्ठलाची सेवा करण्याचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा असे साकडे त्यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.
No comments:
Post a Comment