सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माऊली शिक्षण प्रसारक मंडळ व सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेमध्ये दिवसभर इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. शिक्षकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या कृती व अध्ययन अध्यापनाचा त्यांनी अनुभव घेतला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटो पूजनाने तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटो पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे अवचित्य साधून शिक्षकांवर आधारित असणाऱ्या वेगवेगळ्या रचना प्रस्तुत केल्या व भाषणेही केली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आलेले अनुभव सर्वांसमोर मांडले. कार्यक्रमांमध्ये प्रशलेच्या वतीने सर्व शिक्षकांना भेटवस्तूही देण्यात आल्या. तसेच संस्थेच्या अकॅडेमिक डायरेक्टर व प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांनीही शिक्षकांप्रती असणारे मत व त्यांची भूमिका याविषयी विचार व्यक्त केले. एकूणच मुलांच्या मनामध्ये शिक्षकांप्रती असणारे स्थान व त्यांची प्रतिमा याचा अत्यंत सुंदर प्रत्यय या कार्यक्रमाप्रसंगी पाहण्यास मिळाला. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देत त्यांच्या आशीर्वाद घेतला तसेच आपल्या वतीने गुरुजनांना भेट कार्ड व विविध वस्तू भेट दिल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश (बाबाराजे) बोबडे सर तसेच संस्थेच्या सचिवा सौ सुरजाताई योगेश बोबडे मॅडम यांनी ही सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे अजित घोरपडे सर, सचिन माळी सर, शीतल जाधव मिस, आस्मा मुलाणी मिस तसेच आर्ट टीचर सतीश साळुंखे सर यांचाही मोलाचा वाटा होता. एकूणच आनंदी व उत्साही वातावरणामध्ये कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
0 Comments