Hot Posts

6/recent/ticker-posts

गणपती फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

 गणपती फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा


 टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मौजे अकोले खुर्द, तालुका माढा येथील गणपती फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ॲड.विजयराव हिरवे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  प्रतिमेचे पूजन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गामध्ये अध्यापन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आणि त्याच्यातून त्यांना एक सुखद अनुभव आला. यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करून अध्यापनाचे कार्य किती जोखमीचे आहे हे विशद केले व त्यांना आलेले अनुभव सांगितले.यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व या राष्ट्राच्या उभारणीसाठी शिक्षकाची भूमिका किती महत्वाची आहे हे पटवून दिले. तसेच शिक्षकांनी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवावा याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे  ॲड.विजयराव हिरवे यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना सांगितले आई-वडिलांनंतर आपल्याला घडविण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या शिक्षकांचा  असतो. त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव आणि आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे स्थान लक्षात रहावे यासाठी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे गुण आत्मसात करण्याचा मूलमंत्र दिला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली  बेंदगुडे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा.अक्षय भेंकी, प्रा. सुकुमार लांडे,प्रा. धनश्री कारंडे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. रेणुका शिंदे यांनी कार्य केले.
Reactions

Post a Comment

0 Comments