मुख्यमंत्री म्हणतात कुणबी असल्याचे पुरावे द्या, जरांगे म्हणतात
सरसकट द्या!
जालना (कटूसत्य वृत्त):- ज्यांच्याकडे वंशावळी असेल त्यांना गुरुवारपासून कुणबी प्रमाणापत्र देण्यात येईल. यासाठी जीआर काढण्यात येईल, असं सरकारनं सांगितलं आहे. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत असल्याचं जीआर आम्ही आधी पाहू. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
निजामकाळात मराठ्यांना असणारं आरक्षण आता देखील देण्यात येईल. तसेच सर्व मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. एक महिन्यात ती अहवाल देईल. आपण पारदर्शकता ठेवावी लागेल, अन्यथा लोक मला शेण खाऊ घालतील., असं जरांगे पाटील म्हणाले.
निजामकालीम नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, राज्य सरकार याबाबत जीआर काढणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी जरांगे पाटील यांना दिली.
निवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती एक आठवड्यामध्ये निर्णय देईल अशी माहिती खोतकर यांनी दिली. मराठा आंदोलकांवरील सर्व खटले मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेतील असं सांगण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांची तब्येतीची आम्हाला काळजी आहे. लेखी स्वरुपातील आश्वासन आम्ही त्यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत देऊ, त्यांनी याबाबत आपल्या सहकार्यांशी चर्चा करावी आणि आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केली.
सरकारचा निरोप घेऊन अर्जून खोतकर आणि राजेश टोपे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी खोतकर यांनी जरांगे पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवरुन संपर्क करुन दिला.
0 Comments