शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांतील ज्ञानाबरोबरच कायद्याचेही शिक्षण
द्यावे - पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर
संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात
साजरा
माढा (कटूसत्य वृत्त):- प्राथमिक व माध्यमिक शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांतील ज्ञान व माहितीबरोबरच कायद्याचे शिक्षणही द्यावे जेणेकरून त्यांना जीवनात कायद्याचे ज्ञान व माहिती उपयुक्त ठरेल.भविष्यातील गुन्हे व गुन्हेगारी रोखण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल आणि समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यास नक्कीच मदत होईल असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर यांनी केले आहे. ते आनंदनगर-मानेगाव ता.माढा येथे श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर व चेअरमन विलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कबड्डी, रांगोळी,प्रश्नमंजुषा व लिंबू चमचा स्पर्धेतील लहान व मोठ्या गटातील विजेत्या संघाला व प्रथम क्रमांकाच्या तीन विद्यार्थ्यांना चेअरमन विलास कदम व चेअरमन वैजिनाथ व्हळगळ यांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सहशिक्षक तुकाराम कापसे यांनी सांगितले की,शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट पद्धतीने अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून सन्मान केला पाहिजे.विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त व नियमांचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे.ध्येय प्राप्तीसाठी भरपूर अभ्यास व सराव केला पाहिजे. सर्व प्रकारच्या वाईट व्यसनापासून कायमस्वरूपी दूर राहिले पाहिजे. आईवडिलांच्या व गुरुंच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आदिती भोगे,विद्या शिंदे, अनुष्का गवळी,समीक्षा गवळी,समृद्धी खोत,बलराज मोटे,आरव जगताप, कल्याणी जगताप,श्रुती घोगरे,पूजा पवार,श्रद्धा लटके या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राजंली पवार हिने केले.सूत्रसंचालन हर्षदा पालेकर हिने केले.आभार साक्षी गवळी हिने मानले. यावेळी चेअरमन विलास कदम, चेअरमन वैजिनाथ व्हळगळ,प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके,तुकाराम कापसे,शिवाजी भोगे,सचिन क्षीरसागर,सुनील खोत,सुधीर टोणगे,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्या विद्यार्थ्यी उपस्थित होते.
0 Comments