अकलूज नगर परिषदेच्या निशाण्यावर प्लास्टिक विक्रेते
"अकलूज नगर परिषदने केली प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई"
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज नगर परिषदेच्या निशाणावर प्लास्टिक विक्रेते असून प्लास्टिक विक्रेत्यावर धडक कारवाईची मोहीम अकलूज नगर परिषदेने हाती घेतल्यामुळे प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे.
अकलूज नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम सुरू असून प्लास्टिक विक्रेत्यावर करडी नजर अकलूज नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची आहे. अकलूज नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या विविध सण उत्सव व समारंभाचे दिवस आहेत. अकलूज हे आशिया खंडातील नावाजलेले शहर असून येथे मोठी बाजारपेठ आहे.यामुळे अकलूज शहराच्या लगत गावातील नागरीक खरेदी साठी मोठ्या प्रमाणात शहरात येत असतात. त्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत आहे. यामुळे 1 सप्टेंबर 2023 रोजी बाजारपेठेतील एका दुकानावर अचानकपणे अकलूज नगर परिषद आरोग्य विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या वतीने कारवाई करण्यात येऊन पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. तर शहरातील सर्व उत्पादक,विक्रेते,आस्थापना यांना अकलूज नगर परिषदेच्या वतीने सूचित करण्यात आले आहे की,एकल प्लास्टिक वापर बंद असल्याने ते वापरू नये.अन्यथा नगर परिषद आपणावर दंड, जप्ती तसेच आस्थापना सील करणे या प्रकारे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
येणाऱ्या विविध सणा सुदीच्या दिवसात नगरपरिषद हद्दीत थर्माकोल, प्लास्टिक हँडल बॅग, सजावटीचे थर्माकोल इत्यादी गोष्टींवर बंदी घालण्यात आलेली आहे. तरी शहरातील सर्व नागरिक,मॉल,हातगाडे,फळ विक्रेते,दुकानदार, स्वीट होम मार्ट,सर्व आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करू नये व होणारी कारवाई टाळावी. सर्व नागरिकांनी यापुढे होणारे सण समारंभ ,उत्सव हे पर्यावरण पूरक साजरे करावे.
मुख्याधिकारी दयानंद गोरे
.png)
No comments:
Post a Comment