माढ्यातील प्रेम प्रकरणातील व्यापारी हल्ल्यातील मारेकऱ्यांना २९ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सहा ही आरोपींना सोलापूर कारागृहात हालवले
माढा (कटूसत्य वृत्त):-माढा शहरातील व्यापारी महेंद्र शहा यांच्या वर झालेल्या प्राण घातक हल्ला प्रकरणातील मारेकऱ्यांना २९ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायालयाने ठोठावले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील ६ ही संशयित आरोपींना माढ्यातील उपकारागृहातुन सोलापूरातील कारागृहात हलविण्यात आले आहे.
माढ्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीचे पाडकाम सुरु असुन पोलिस कोठडीतील आरोपी असल्यामुळे उपकारागृह पाडण्याचे काम रखडले होती.माढ्याच्या जेल मधील २४ आरोपीना माळशिरस ला तर या प्रकरणातील ६ आरोपींना सोलापूरला हलवण्यात आले आह
प्रेम विवाहास अडथळा ठरत असल्यामुळे मुलगी साक्षी शहा हिच्यासह प्रियकर चैतन्य कांबळे यांचेसह एकुण ६ संशयितांवर गुन्हा दाखल झाला असुन या पुर्वी २ वेळा पोलिस कोठडी झालेल्यांना या मारेकऱ्यांना माढा न्यायालया समोर उभे केले असता २९ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिश श्रीमती व्ही.सी.क्षीरसागर यांनी ठोठावलेत.पोलीस निरीक्षक बि.एस.खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद शेख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
चौकट) शहा यांच्या तब्यतीत सुधारणा-महेद्र शहा यांना हल्यात झालेली मारहाण ही गंभीर दुखापत असुन डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सोलापूरात उपचार सुरु आहेत.सध्या त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊ लागली असुन मेंदुची सुज देखील कमी झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment