शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे एक दिवसीय थाळी नाद आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आदर्श शिक्षक समिती उपशाखा- पंढरपूरने पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत एक दिवसीय थाळी नाद आंदोलन आदर्श शिक्षक समिती पंढरपूरचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब उर्फ मारुती मिसाळ तसेच महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेश्मा कवडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सदर आंदोलनाला जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष रियाज मुलाणी तसेच शिक्षक भरती संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय हेगडे यांनी लेखी स्वरुपात पाठिंबा दिला.
सदर आंदोलन स्थळी पंढरपूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन निवेदनातील 1तारखेला शिक्षकांचे वेतन, सेवापुस्तिका कॅम्प, थकीत वेतन , चटोपाध्याय वेतनश्रेणी फरक वेतन , सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन व इतर लाभ, 2023 मधील आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा कर्तव्य कालावधी जि प स्तरावरून मागणी आदेश , बीएलओ आदेश रद्द करणे, निरक्षर सर्वेक्षण , नव्याने मराठी हिंदी भाषा विषय सुट प्रस्ताव मागणी, वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागणी, विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशाचे अनुदान वितरण या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून हे सर्व प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत. निश्चितपणे थोड्या दिवसांमध्ये या सर्व प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक केली जाईल ,असे आश्वासित केले.
यावेळी आदर्श शिक्षक समिती सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ताई सातपुते, सरचिटणीस सूर्यकांत होनमाने, कार्याध्यक्ष संजीव चाफाकरंडे, जिल्हा सोसायटीचे संचालक रविंद्र (काका)पाटील, माळशिरसचे तालुकाध्यक्ष पोपट भोसले , जिल्हा कोषाध्यक्ष तात्या गोरड,शिक्षक नेते राम कोळी, विजय लोंढे, अनिल खडाखडे, रविकिरण मोरे , सिद्धेश्वर लोंढे, सत्यवान कारंडे ,विठ्ठल सावंत, सुनील ननवरे,पंढरपूर तालुका उपाध्यक्ष विजय शिंदे,प्रसिद्धी प्रमुख परमेश्वर घोडके,कोषाध्यक्ष राहुल जाधव , जुनी पेन्शन संघटनेचे विजय राऊत, बाबाराजे घोडके, पोपट खाडे, प्रकाश तोटेवाड ,अशोक मस्के , आप्पा माळी , सिकंदर पवार तसेच पंढरपूर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment