Hot Posts

6/recent/ticker-posts

पीसीईटी आणि वर्ल्डलाइन कंपनीमध्ये सामंजस्य करार

पीसीईटी आणि वर्ल्डलाइन कंपनीमध्ये सामंजस्य करार

पिंपरी,(कटूसत्य वृत्त):-पुणे जिह्यामधील नामांकित शिक्षण संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि वर्ल्डलाइन ग्लोबल या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. वर्ल्डलाइन ग्लोबल कंपनीचा जगभर ४० देशांमध्ये विस्तार असून १८००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आहे. या करारामुळे पीसीईटीच्या चारही अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशिक्षण आणि नोकरीसाठी उपयोग होईल. पीसीटीच्या पुढील वाटचालीसाठी हा करार उपयोगी ठरेल यामुळे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व संस्थेच्या विश्वस्तांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे अशी माहिती पीसीईटी, नूतन व पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.  
           या कराराअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच विध्यार्थ्यांना कंपनीमार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सामंजस्य करारावर पीसीईटी च्या वतीने डॉ. शितलकुमार रवंदळे आणि वर्ल्ड लाइन ग्लोबल कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वेंकट श्रीरामागिरी यांनी हिंजेवाडी येथील कंपनीच्या कार्यालयात सामंजस्य केला. यावेळी वर्ल्डलाइन तर्फे पॅरिस येथील मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख फ्लोरेन्स गॅलॉईस, शिल्पा हडके व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर पीसीईटी च्या वतीने डॉ. महेश कोलते, डॉ. विलास देवतारे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. अर्चना चौघुले  व डॉ. अपर्णा पांडे उपस्थित होते. 
    सामंजस्य करारासाठी पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, ट्रस्टी व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी यांनी अभिनंदन केले आहे.
पिंपरी, पुणे (दि.१२ ऑगस्ट २०२३) पुणे जिह्यामधील नामांकित शिक्षण संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि वर्ल्डलाइन ग्लोबल या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. वर्ल्डलाइन ग्लोबल कंपनीचा जगभर ४० देशांमध्ये विस्तार असून १८००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आहे. या करारामुळे पीसीईटीच्या चारही अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशिक्षण आणि नोकरीसाठी उपयोग होईल. पीसीटीच्या पुढील वाटचालीसाठी हा करार उपयोगी ठरेल यामुळे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व संस्थेच्या विश्वस्तांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे अशी माहिती पीसीईटी, नूतन व पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.  
           या कराराअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच विध्यार्थ्यांना कंपनीमार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सामंजस्य करारावर पीसीईटी च्या वतीने डॉ. शितलकुमार रवंदळे आणि वर्ल्ड लाइन ग्लोबल कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वेंकट श्रीरामागिरी यांनी हिंजेवाडी येथील कंपनीच्या कार्यालयात सामंजस्य केला. यावेळी वर्ल्डलाइन तर्फे पॅरिस येथील मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख फ्लोरेन्स गॅलॉईस, शिल्पा हडके व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर पीसीईटी च्या वतीने डॉ. महेश कोलते, डॉ. विलास देवतारे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. अर्चना चौघुले  व डॉ. अपर्णा पांडे उपस्थित होते. 
    सामंजस्य करारासाठी पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, ट्रस्टी व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी यांनी अभिनंदन केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments