विजयराज दादा म्हणजे आपलंसं वाटणार नेतृत्व : अंकुश भैय्या अवताडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

विजयराज दादा म्हणजे आपलंसं वाटणार नेतृत्व : अंकुश भैय्या अवताडे

 विजयराज दादा म्हणजे आपलंसं वाटणार नेतृत्व : अंकुश भैय्या अवताडे

 विरवडे ब. येथे विजयराज डोंगरे यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा


 कुरुल (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सारखं महत्त्वाचं पद संभाळून विजयराज दादा डोंगरे यांनी मोहोळ तालुक्यात विकासाची गंगा आणली. खास करून तालुक्यातील दक्षिण भागाला विजयराज दादा यांच्यामुळे निधी काय असतो हे कळालं. एवढ्या महत्त्वाच्या पदावर असताना देखील दादा नेहमी कार्यकर्त्याच्या गराड्यात असतात त्यामुळेच विजयराज दादा हे सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना आपलंसं वाटणारे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भैय्या अवताडे यांनी केले.
 सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम माजी सभापती विजयराज दादा डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील विरवडे ब. येथे वृक्षारोपण, नव मतदार नोंदणी शिबिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आधी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी लोकशक्ती परिवाराचे नेते जयसिंग नाना आवताडे, कामती खुर्द चे माजी उपसरपंच विठ्ठल भाऊ माळी, युवा उद्योजक लहू आवताडे, संतोष अवताडे, महेश कांबळे, गणेश जेऊरे, विशाल कांबळे, बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages