हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशन अरणचा जीवनगौरव पुरस्कार सापटणे च्या मुरलीधर कोरडे यांना प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 23, 2023

हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशन अरणचा जीवनगौरव पुरस्कार सापटणे च्या मुरलीधर कोरडे यांना प्रदान

हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशन अरणचा जीवनगौरव पुरस्कार सापटणे च्या मुरलीधर कोरडे यांना प्रदान


अरण (कटूसत्य वृत्त):-मंगळवार दि. 22 रोजी सकाळी 12 वा. अरण,ता- माढा येथे अरणभूषण हरिभाऊ नाना शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सापटणे च्या मुरलीधर कोरडे (गुरुजी ) यांना 'जीवन गौरव पुरस्कार' आ. बबनदादा शिंदे,माजी.आ. विनायकराव (बापू ) पाटील व विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे उपाध्यक्ष वामन भाऊ उबाळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. समाज्यातील तळागाळातील लोकांसाठी आयुष्यभर झगडणारे हरिभाऊ नाना शिंदे यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. त्यामुळे या पुरस्काराचीही उंची वाढलेली आहे, शैक्षणिक कार्य करणाऱ्या मुरलीधर कोरडे या आदर्श व्यक्तीला हा पुरस्कार हरिभाऊ नाना  शिंदे  फाऊडेशन ने देऊन मोठे  कार्य केले आहे.  नानांचे आदर्श पुढे चालवावे  हे फाउंडेशन सामाजिक, बांधिलकी जोपासत आहे.अरण ता. माढा येथील हरिभाऊ (नाना) शिंदे फाऊडेशन अरणच्या  वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार वितरण  प्रसंगी आ. बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी  विठ्ठलराव शिंदे स. सा. कारखान्याचे व्हा. चेअरमन वामन  उबाळे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे मा. सभापती संजय पाटील भिमानगर, जि. प. सदस्य भारत  शिंदे, माजी सभापती शिवाजीराव कांबळे, माझी जी प सदस्य संजय पाटील घाटणेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती  प्रतापराव नलावडे,  दूध संघाचे मा. संचालक शिवाजीराव पाटील, रमेश पाटील पंचायत समिती कुर्डूवाडीचे माजीउपसभापती बंडू  ढवळे, मोडनिंबचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब देशमुख, तुळशीचे दिगंबर माळी, बैरागवाडी चे औदुंबर सुर्वे,जाधववाडीचे मा. सरपंच गणेश महाडिक, पडसाळीचे सरपंच योगेश पाटील, अरणच्या सरपंच सौ. सुरत्नप्रभा ताकतोडे, उपसरपंच वसंत इंगळे, कवी सावता घाडगे, माजी प्राचार्य हरिदास रणदिवे, माजी प्राचार्य उत्तमराव सावंत हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक यशवंत (दादा) शिंदे, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सचिव बाबासाहेब शेळके इत्यादी मान्यवर पदाधिकारी तसेच परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिभाऊ नाना शिंदे यांच्या पुण्यतिथीच्या व आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे उपाध्यक्ष वामन भाऊ उबाळे, किसन जाधव,दीपक कुलकर्णी,काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये 143 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक सोलापूर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरासाठी संजय शिंदे, आशिष शेंडगे,आनंद कुलकर्णी संदीप पाटील,यशवंत शिंदे यांनी  शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.  त्याचबरोबर नेत्र रोग शिबीर व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. बुधराणी  हॉस्पिटलच्या साधू वासवानी चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले या शिबिराचे उदघाटन प्रकाश गायकवाड,अरण चे उपसरपंच वसंत इंगळे, नागनाथ रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरांमध्ये 80 लोकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी  34  रुग्ण आढळले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आबासाहेब सोलंकर,सावता घाडगे,महादेव निंबाळकर रविकांत सुर्वे यांनी प्रयत्न केले. उपस्थित यांचे स्वागत शहाजी शेळके,समाधान जाधव,विशाल शेळके, गणेश शिंदे, बालाजी रणदिवे, सुरेश भापकर,यशवंत शिंदे,प्रशांत कोरडे, अनिल गाजरे, विठ्ठल पाटील,अजिंक्य काटकर दिग्विजय सावंत यांनी केले. कोरडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश घाडगे तर आभार बाबासाहेब शेळके यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages